मेहनत करण्याची तयारी पाहिजे! पिशव्या विक्रेते दीपक यांची प्रेरणादायी कहाणी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
बदलत्या मुंबईत स्वतःचा मार्ग तयार करणारे दादर येथील दीपक सुर्वे गेली तीन ते चार दशके स्वामी समर्थ मठाच्या गल्लीत कापडी पिशव्यांचा व्यवसाय करत आहेत.
मुंबई: तीस-चाळीस वर्षांपूर्वीची मुंबई वेगळीच होती. त्या काळात अनेक जण दिवसभर काम करून फक्त दोन रुपयांचा मोबदला मिळवायचे. महिना पंधरा रुपयांमध्ये नोकरी करणारे लोक होते. आज मात्र काळ बदलला आहे. लोकसंख्या वाढली, खर्च वाढला आणि दोन रुपयांची किंमत दोन हजार रुपयांएवढी झाली आहे.
या बदलत्या मुंबईत स्वतःचा मार्ग तयार करणारे दादर येथील दीपक सुर्वे गेली तीन ते चार दशके स्वामी समर्थ मठाच्या गल्लीत कापडी पिशव्यांचा व्यवसाय करत आहेत. पूर्वी वृत्तपत्र विकून आणि किरकोळ काम करून महिन्याला साधे पंधरा रुपये मिळवणारे सुर्वे, आज स्वतःचा छोटासा स्टॉल सांभाळतात आणि सकाळी कार वॉशचे कामही करतात.
advertisement
आज त्यांच्या मेहनतीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पूर्वीची महिन्याची कमाई आता दिवसाला मिळू लागली आहे. सुर्वे दररोज एक ते दोन हजार रुपये मिळवतात आणि ही उंची त्यांनी पूर्णपणे स्वतःच्या कष्टावर गाठली आहे.
स्टॉलवर उपलब्ध कापडी पिशव्यांचे विविध प्रकार
दीपक सुर्वे यांच्या स्टॉलवर कापडी पिशव्यांचे अनेक प्रकार मिळतात
पैठणी डिझाईनच्या पिशव्या
लेदर लूक पिशव्या
advertisement
छोट्या आकाराच्या दैनंदिन वापराच्या बॅग्स (30 ते 50 रुपयांपासून)
खाण्याच्या वस्तूंसाठी पिशव्या
टिकाऊ कापडी शॉपिंग पिशव्या (100 ते 120 रुपयांमध्ये उपलब्ध)
या पिशव्या स्वस्त, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक असल्याने गर्दीच्या बाजारातही त्यांना चांगली मागणी आहे.
बदलत्या काळात टिकून राहिलेल्या मेहनतीची कहाणी
view commentsमुंबईतील खर्च, गती, लोकसंख्या आणि बाजारपेठ या सर्वांमध्ये मोठा बदल झाला. पण या बदलांचा सामना करत स्वतःचा छोटा व्यवसाय टिकवून ठेवत, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत आपली वाट तयार करणारी दीपक सुर्वे यांची कहाणी आज अनेकांना प्रेरणा देणारी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 04, 2025 8:20 PM IST

