LIC पॉलिसी डेथ क्लेमसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? क्लेम कसा करायचा घ्या जाणून

Last Updated:

LIC Policy: कोणत्याही पॉलिसीसाठी डेथ क्लेम करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवा की LIC विम्याची डेथ क्लेमची प्रक्रिया केवळ ऑफलाइन पूर्ण केली जाऊ शकते.

एलआयसी पॉलिसी क्लेम
एलआयसी पॉलिसी क्लेम
मुंबई : LIC ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी जीवन विमा कंपनी आहे. त्याचे देशभरात करोडो पॉलिसीधारक आहेत. एलआयसीची पॉलिसी पॉलिसीधारकाला कव्हर देण्याबरोबरच बचत करण्याचे काम करते. अशा परिस्थितीत जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी झाला, तर नॉमिनी विम्याचा डेथ क्लेम घेऊ शकतो. विम्याचा डेथ क्लेम करताना, नॉमिनीला अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. ही क्लेमची रक्कम भरण्यापूर्वी एलआयसी सर्व कागदपत्रांची क्रॉस-व्हेरिफिकेशन करते आणि त्यानंतरच क्लेमची प्रक्रिया पूर्ण होते. तुम्हालाही कोणत्याही पॉलिसीचा डेथ क्लेम घ्यायचा असेल, त्याची प्रक्रिया आणि कागदपत्रांची माहिती चेक करा.
कोणत्याही पॉलिसीसाठी डेथ क्लेम करण्यापूर्वी, हे लक्षात ठेवा की LIC विम्याची डेथ क्लेमची प्रक्रिया केवळ ऑफलाइन पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला प्रथम एलआयसीच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. यासोबतच या सर्व कागदपत्रांवर विमा एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसरची सही आवश्यक असेल.
advertisement
कोणती कागदपत्रे लागतील?

> पॉलिसी धारकाचे मृत्यू प्रमाणपत्र
>> पॉलिसी बाँड
>> नॉमिनीचे आधार आणि पॅन कार्ड
>> डेथ क्लेम फॉर्मवर विमा एजंट किंवा डेव्हलपमेंट ऑफिसरची सही
>> नॉमिनीला पासबुक किंवा त्याच्या बँक खात्याचा कॅन्सल चेक द्यावा लागेल.

advertisement
LIC डेथ क्लेम कसा दाखल करावा?
विमा पॉलिसीसाठी डेथ क्लेम दाखल करण्यासाठी, तुम्ही प्रथम पॉलिसीधारकाच्या होम ब्रान्चला भेट दिली पाहिजे. तेथे तुमच्या नातेवाईकाच्या मृत्यूची माहिती द्या आणि फॉर्म 3783, 3801 आणि एनईएफटी फॉर्म भरा. त्यानंतर वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे जमा करा. यासह, एक इंटिमेशन लेटर सादर करा. यामध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूशी संबंधित सर्व माहिती नोंदवली जाईल. यासोबतच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स किंवा कॅन्सल चेक NEFT फॉर्ममध्ये सबमिट करा. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. तुम्हाला पावती स्लिप मिळेल जी तुमच्याकडे ठेवावी. 10 ते 15 दिवसात तुमच्या खात्यात क्लेमचे पैसे जमा होतील.
view comments
मराठी बातम्या/मनी/
LIC पॉलिसी डेथ क्लेमसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक? क्लेम कसा करायचा घ्या जाणून
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement