Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले, भारतासह 75 देशांवरील टॅरिफला तुर्तास ब्रेक

Last Updated:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब टाकून जगभरात एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या निर्णयाला अमेरिकेतून कडाडून विरोध झाला.

News18
News18
मुंबई : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ बॉम्ब टाकून जगभरात एकच खळबळ उडवून दिली. त्यांच्या या निर्णयाला अमेरिकेतून कडाडून विरोध झाला. अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या. अखेरीस डोनाल्ड ट्रम्प यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी आता 75 देशांसाठी जाहीर केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफवर 90 दिवसांची स्थगिती आणली आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल तशी घोषणा केली आहे. पण चीनवर मात्र टॅरिफवर आणखी वाढवला आहे. चीनवर आता टॅरिफ 125 टक्के वाढवला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या निर्णयावर तुर्तास नरमाईची भूमिका घेतली आहे.  ज्या 75 पेक्षा जास्त देशांनी अमेरिकेच्या ट्रेड, टॅरिफ, करन्सी आणि इतर नॉन मोनेटरी मुद्यावर चर्चा करण्याची इच्छा दाखवली आहे. त्यांच्याविरोधात अमेरिकन सरकार कोणतीही कारवाई करणार नाही. त्यांच्यासाठी  ‘रिसिप्रोकल टॅरिफ’वर ९० दिवसांची स्थगिती लावण्यात आली आहे. आता फक्त १० टक्के असा एक नवी टॅरिफ प्लॅन तयार करण्यात आली आहे. पण हा निर्णय लगेच लागू होईल. अमेरिकेचं सरकार हे सकारात्मकपणे चर्चा करण्यासाठी संधी देत आहे. सगळ्यांसोबत चर्चेसाठी दार नेहमी मोकळे आहे, असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. 
advertisement
चीनवर आता १०४ टक्के टॅरिफ
दरम्याान, ट्रम्प यांनी चीनवर मात्र टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. ट्रम्प यांनी चीनवर आता 125 टक्के इतका टॅरिफ लावला आहे. जो आधी १०४ इतका होता. चीननही ट्रम्प यांना उत्तर देत अमेरिकेवरच टॅरिफ पलटवार केला होता. चीनने 8 एप्रिलपर्यंत ही 34% टॅरिफ वाढ रद्द केली नाही, तर अमेरिका 9 एप्रिलपासून 50% अतिरिक्त टॅरिफ लागू करेल. यासोबतच चीनसोबत प्रस्तावित कोणतीही बैठक थांबवली जाईल आणि इतर देशांशी नव्या वाटाघाटी तत्काळ सुरू होतील, अशी धमकीच आधीच ट्रम्प यांनी दिली होती. आता ती धमकी ट्रम्प यांनी खरी करून दाखवली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प अखेर नरमले, भारतासह 75 देशांवरील टॅरिफला तुर्तास ब्रेक
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement