भारत ट्रम्प यांच्या दादागिरीला धक्का देणार,अमेरिकेत खळबळ; इंडियासह रशिया-चीनची एकच खेळी पुरेशी

Last Updated:

India-Russia-China vs America: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारतावर थेट 50% टॅरिफ लावून आर्थिक दडपशाही सुरू केली आहे. पण रशिया आणि चीनसोबत भारताची वाढती जवळीक अमेरिकेच्या डॉलर वर्चस्वाला थेट आव्हान देत आहे.

News18
News18
नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारताविषयी वैयक्तिक राग व्यक्त करत आहेत, असं चित्र सध्या दिसतं आहे. कारण त्यांनी इतर सर्व देशांना वगळून केवळ भारतावरच थेट 50 टक्क्यांचा टॅरिफ लावला आहे. ट्रम्प यांच्या निशाण्यावर फक्त भारतच नाही तर रशिया आणि चीनसुद्धा आले आहेत. याचा अर्थ असा की अमेरिकेचे अध्यक्ष सध्या रशिया, भारत आणि चीन या तिघांवर एकाचवेळी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात एकच प्रश्न घोंगावत आहे – की हे तिन्ही देश एकत्र येऊन अमेरिकेची दादागिरी संपवू शकतात का?
अमेरिकेला सर्वात जास्त फायदा जागतिक बाजारात डॉलरमध्ये होणाऱ्या व्यवहारांमधून होतो. मग प्रश्न असा उभा राहतो की, रशिया, भारत आणि चीन एकत्र येऊन डॉलरला टक्कर देऊ शकतात का?
या प्रश्नाचे उत्तर खुद्द ट्रम्प यांच्या झुंजललेल्या प्रतिक्रियेतूनच मिळते. लक्षात ठेवा की ब्रिक्स परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी डॉलरच्या पर्यायावर काम करणाऱ्या रशिया, भारत आणि चीनला धमकी दिली होती. ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले होते की जर ब्रिक्स देश डॉलरला कमकुवत करण्याचा कट रचत असतील, तर अशा देशांवर 100 टक्के टॅरिफ लावला जाईल. सध्या तरी भारताने अशी कोणतीही पावले उचललेली नाहीत. तरीही ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले आहे. हे स्पष्ट सूचित करते की ट्रम्प यांना भीती वाटते की हे तीन देश एकत्र आले तर डॉलरला खरोखरच धोका पोहोचू शकतो.
advertisement
डॉलरला कसे देऊ शकतात टक्कर?
अमेरिकन डॉलरला टक्कर देण्यासाठी भारताने सध्या तरी फारसे स्पष्ट पावले उचललेली नसली, तरी रशिया आणि चीन मात्र यावर बऱ्याच काळापासून काम करत आहेत. चीनने अनेक देशांसोबत स्थानिक चलन म्हणजे युआनमध्ये व्यवहार करायला सुरुवात केली आहे. रशियाने तर युक्रेन युद्धानंतर डॉलरमधील व्यवहार मोठ्या प्रमाणावर कमी केले आहेत आणि स्थानिक चलनात व्यापार सुरू केला आहे.
advertisement
भारतानेही काही प्रमाणात ईराण, रशिया यांसारख्या देशांसोबत रुपयामध्ये व्यवहार केले आहेत. पण अद्याप जागतिक बाजारात कोणतीही लक्षणीय डील स्थानिक चलनात झालेली नाही. मात्र जर हे तिन्ही देश आपापल्या चलनात परस्पर व्यवहार करू लागले. तर डॉलरला निश्चितच मोठी टक्कर दिली जाऊ शकते.
काय असू शकते रणनीती?
अमेरिकेला आपले वर्चस्व टिकवण्यासाठी आणि व्यापार वाढवण्यासाठी मोठ्या बाजाराची गरज आहे. हे सगळ्यांना माहीत आहे की भारत आणि चीन हे दोन्ही जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेले देश आहेत, म्हणजेच सर्वात मोठे उपभोक्ता आहेत. याचबरोबर हे दोघंही देश जगाची फॅक्टरी मानले जातात. चीन सध्या जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि भारतही त्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
advertisement
या अर्थाने पाहिलं तर हे दोन्ही देश मोठ्या प्रमाणावर उत्पादनही करतात आणि तितक्याच प्रमाणात खरेदीही. जर हे दोघं रशियासोबत मिळून स्थानिक चलनात व्यवहार करू लागले तर डॉलरच्या आधिपत्याला मोठं आव्हान उभं राहू शकतं.
तिन्ही देशांतील व्यापार किती?
भारत-रशिया व्यापार: आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 65 अब्ज डॉलरहून अधिक होता.
advertisement
भारत-चीन व्यापार: 130 अब्ज डॉलरपेक्षा अधिक.
रशिया-चीन व्यापार: 200 अब्ज डॉलरपेक्षा अधिक.
एकत्रित पाहिल्यास, या तिन्ही देशांमधील एकूण व्यापार सुमारे 390 अब्ज डॉलर इतका होता आणि तो पुढे 400 अब्ज डॉलरच्या वर जाण्याची शक्यता आहे.
भारत-रशिया-चीनचा जागतिक व्यापार
भारत: आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार सुमारे 1.83 ट्रिलियन डॉलर (1,830 अब्ज डॉलर) इतका होता. यामध्ये उत्पादनांचा व्यापार 1,300 अब्ज डॉलर आणि सेवा व्यापार सुमारे 500 अब्ज डॉलरपेक्षा अधिक होता.
advertisement
चीन: उत्पादन निर्यात – 3.59 ट्रिलियन डॉलर, आयात – 2.56 ट्रिलियन डॉलर, एकूण उत्पादन व्यापार – 6.15 ट्रिलियन डॉलर. सेवा व्यापारासह एकूण – 7.56 ट्रिलियन डॉलर.
रशिया: उत्पादन निर्यात – 424 अब्ज डॉलर, आयात – 304 अब्ज डॉलर, एकूण – 728 अब्ज डॉलर. सेवांचा समावेश केल्यास एकूण – 865 अब्ज डॉलर.
advertisement
तिन्ही देशांचा एकत्रित व्यापार: 10 ट्रिलियन डॉलरहून अधिक.
अमेरिकेचा जागतिक व्यापार
2024 मध्ये एकूण व्यापार: सुमारे 7 ट्रिलियन डॉलर.
उत्पादन निर्यात – 2 ट्रिलियन डॉलर,
आयात – 3.37 ट्रिलियन डॉलर (एकूण माल व्यापार – 5.43 ट्रिलियन डॉलर).
सेवा निर्यात – 928 अब्ज डॉलर,
सेवा आयात – 700 अब्ज डॉलर.
सेवा व्यापार – 1.63 ट्रिलियन डॉलर.
एकूण अमेरिका व्यापार: सुमारे 7 ट्रिलियन डॉलर.
आकड्यांवरून स्पष्ट काय होते?
जर हे तिन्ही देश स्वतंत्रपणे अमेरिकेचा सामना करण्याचा प्रयत्न करतील तर हे कठीण आहे. कारण अमेरिका एकट्याचं व्यापार चीनपेक्षाही जास्त आहे. पण जर चीन, भारत आणि रशिया एकत्र येऊन अमेरिकेच्या विरोधात उभे राहिले. तर त्यांचा एकत्रित व्यापार अमेरिकेच्या एकूण व्यापारापेक्षा अधिक आहे. हे आकडे स्पष्ट दाखवतात की हे तिन्ही देश जर एकत्र येऊन अमेरिकन डॉलरच्या विरोधात उभे राहिले तर ते जागतिक बाजारात निश्चितपणे मोठं आव्हान उभं करू शकतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
भारत ट्रम्प यांच्या दादागिरीला धक्का देणार,अमेरिकेत खळबळ; इंडियासह रशिया-चीनची एकच खेळी पुरेशी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement