क्रेडिट कार्डवरुन केलेल्या EMI वर इंटरेस्ट-फ्री पीरियड मिळतो का? सोप्या भाषेत समजून घ्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
EMI वर इंटरेस्ट-फ्री पीरियड मिळत नाही. EMI मध्ये खरेदी केल्यास बँक व्याज आकारते. 'नो कॉस्ट EMI' मध्ये व्याज वस्तूच्या किमतीत समाविष्ट असते. खरेदीपूर्वी व्याजदर तपासणे महत्त्वाचे.
एकदम पैसे नाहीत तेव्हा आपली स्वप्न पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग असतो ते म्हणजे EMI, मोठ्या किंमतीच्या वस्तू EMI करुन खरेदी करायच्या आणि त्यातून हळूहळू हप्ते फेडायचे आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं हे मध्यमवर्गीय लोकांची मानसिकता आहे. मात्र याच दरम्यान होण्याऱ्या छोट्या छोट्या चुकांमुळे बऱ्याचदा या EMI च्या कचाट्यातून सुटण्याऐवजी जास्तच गुरफटत जातो आणि मग मुदत संपली तरी EMI बँकेकडून मात्र वसूल करुन घेतला जातो.
ज्या प्रमाणे क्रेडिट कार्डला इंटरेस्ट रेटचा फ्री पीरियड मिळतो त्याप्रमाणे इथे EMI वर मिळत नाही. क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी असतो की, EMI वर इंटरेस्ट-फ्री पीरियड मिळतो का? तर याचं उत्तर आहे नाही. क्रेडिट कार्डवरील इंटरेस्ट-फ्री पीरियड आणि EMI हे या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. या दोन्ही संकल्पना सोप्या भाषेत समजून घेतल्या तर तुम्हाला पेमेंट करणं सोपं होईल.
advertisement
इंटरेस्ट-फ्री पीरियड म्हणजे काय?
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून कोणतीही खरेदी करता आणि तुमच्या बिलाची पूर्ण रक्कम देय तारखेपूर्वी (due date) भरता, तेव्हा बँक साधारणपणे २० ते ५० दिवसांचा इंटरेस्ट-फ्री पीरियड देते. या काळात तुमच्याकडून कोणतेही व्याज घेतले जात नाही. हा कालावधी केवळ तेव्हाच लागू होतो, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचे संपूर्ण बिल वेळेवर भरता.
advertisement
EMI चे गणित वेगळे
दुसरीकडे, जेव्हा तुम्ही एखादी मोठी खरेदी EMI मध्ये रूपांतरित करता, तेव्हा ती एक प्रकारच्या कर्जात (loan) बदलली जाते. तुम्ही जसे EMI चा पर्याय निवडता, त्याच क्षणापासून बँक त्या रकमेवर व्याज आकारायला सुरुवात करते. हे व्याज तुमच्या मासिक हप्त्यामध्ये (EMI) समाविष्ट असते. त्यामुळे तुम्ही भरत असलेल्या प्रत्येक हप्त्यात मूळ रक्कम आणि त्यावर आकारलेले व्याज दोन्हीचा समावेश असतो. थोडक्यात, EMI वर इंटरेस्ट-फ्री पीरियडची सुविधा मिळत नाही.
advertisement
समजा तुम्ही 50,000 चा एखादा मोबाईल फोन खरेदी केला आणि 6 महिन्यांच्या EMI चा पर्याय निवडला. बँक त्या 50,000 वर पहिल्या दिवसापासूनच व्याज आकारणे सुरू करेल. अशा वेळी, क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट-फ्री पीरियड लागू होत नाही. त्यामुळे, क्रेडिट कार्ड EMI वापरताना या नियमाची माहिती असणे महत्त्वाचे आहे. कोणताही छुपा खर्च टाळण्यासाठी EMI निवडण्यापूर्वी लागू होणारे व्याजदर तपासणे शहाणपणाचे ठरते. प्रत्येक बँकनुसार हे व्याजदर वेगवेगळे असतं, काही बँका ऑफरमध्ये नो कॉस्ट EMI देखील देतात.
advertisement
No Cost EMI म्हणजे अशी योजना जिथे तुम्ही एखादी वस्तू हप्त्यांमध्ये खरेदी करता, पण तुम्हाला त्यावर कोणतेही व्याज द्यावे लागत नाही, असा दावा केला जातो. ही सुविधा अनेकदा ई-कॉमर्स साइट्स, इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स किंवा मोठ्या वस्तूंच्या खरेदीवर दिली जाते. वरवर पाहता ही योजना खूप आकर्षक वाटते, पण यामागचे गणित समजून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांनुसार, कोणताही कर्ज व्यवहार पूर्णपणे व्याजमुक्त नसतो. त्यामुळे, 'नो कॉस्ट ईएमआय' च्या नावाखाली व्याज दुसऱ्या मार्गाने वसूल केले जाते.'नो कॉस्ट ईएमआय' मध्ये व्याज आकारले जात नाही, कारण ते आधीच वस्तूच्या किमतीत समाविष्ट केलेले असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तपासूनच तुम्ही खरेदी करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 1:56 PM IST
मराठी बातम्या/मनी/
क्रेडिट कार्डवरुन केलेल्या EMI वर इंटरेस्ट-फ्री पीरियड मिळतो का? सोप्या भाषेत समजून घ्या