शेअर बाजार बंद होताच आली मोठी बातमी; उद्या Market ओपन होताच Money Rain होणार!

Last Updated:

Share Market Prediction: गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर विप्रो, पॉलीकॅब, जिओ फायनान्शियल, एक्सिस बँक आणि एलटीआयमाइंडट्री यांनी तिमाही निकाल जाहीर केले. विप्रोचा नफा 11%, पॉलीकॅबचा 49.32%, जिओचा 3.8%, एक्सिसचा 3.8% घट, LTIMindtreeचा 10.6% वाढ.

News18
News18
मुंबई: गुरुवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर पाच मोठ्या कंपन्यांनी आपल्या तिमाही निकालांची घोषणा केली आहे. यात विप्रो (Wipro), पॉलीकॅब, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, एक्सिस बँक आणि एलटीआयमाइंडट्री (LTIMindtree) यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी उत्तम कामगिरी केली असून त्याचा परिणाम उद्या (शुक्रवारी) त्यांच्या शेअर्सवर दिसून येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या कंपनीला किती नफा झाला.
विप्रो (Wipro) ला जोरदार नफा
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात वर्ष-दर-वर्ष 11% वाढ झाली असून तो 3330.4 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मात्र तिमाहीच्या तुलनेत हा नफा 6.7% ने घटला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑपरेशनल रेव्हेन्यू 0.77% वाढून 22,134.6 कोटी रुपये झाला आहे. विप्रोने 5 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. ज्याची रेकॉर्ड तारीख 28 जुलै 2025 असेल. आज (गुरुवारी) विप्रोचे शेअर्स 0.93% वाढून 260.25 रुपयांवर बंद झाले.
advertisement
Polycab India ला किती नफा झाला?
पॉलीकॅब इंडियाचा एकत्रित निव्वळ नफा 49.32% वाढून 599.70 कोटी रुपये झाला आहे. तर ऑपरेशनल रेव्हेन्यू 25.71% वाढून 5,906 कोटी रुपये झाला आहे. टॅक्सपूर्व नफा (PBT) 800.59 कोटी रुपये झाला असून, यात वर्ष-दर-वर्ष 50.10% वाढ झाली आहे.
EBITDA (व्याज, कर, घसारा आणि इतर खर्चांपूर्वीचा नफा) 47% वाढून 857.60 कोटी रुपये झाला आहे. EBITDA मार्जिन 12.4% वरून 14.5% पर्यंत पोहोचला आहे. आज पॉलीकॅबचे शेअर्स 1.12% घसरून 6,870 रुपयांवर बंद झाले.
advertisement
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे निकाल
मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनेही चांगले निकाल सादर केले आहेत. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 3.8% वाढून 324.66 कोटी रुपये झाला आहे. एक वर्षापूर्वी तो 312.63 कोटी रुपये होता. ऑपरेशन्समधून मिळालेला एकत्रित रेव्हेन्यू 46.58% वाढून 612.46 कोटी रुपये झाला आहे. आज कंपनीचा शेअर किंचित घसरून 319 रुपयांवर बंद झाला.
advertisement
एक्सिस बँकचे निकाल
जून तिमाहीत एक्सिस बँकेच्या नफ्यात 3.8% घट झाली असून तो 5,806.14 कोटी रुपये झाला आहे. मात्र बँकेचा ऑपरेटिंग प्रॉफिट 14% वाढून 11,515 कोटी रुपये झाला आहे. कोअर ऑपरेटिंग प्रॉफिट 5% वाढून 10,095 कोटी रुपये झाला आहे. नेट इंटरेस्ट इनकम 0.8% वाढून 13,560 कोटी रुपये झाली आहे. नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) 3.80% आहे.
advertisement
LTIMindtree चे निकाल
कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून नफ्यात 10.6% वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण नफा 1,254.1 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा रेव्हेन्यू 7.6% वाढून 9,840.6 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या बोर्डाने 1 रुपयाच्या फेस व्हॅल्यूवर 67,252 नव्या शेअर्सला मान्यता दिली आहे. आज LTIMindtree चे शेअर्स 2.55% घसरून 5,190.95 रुपयांवर बंद झाले.
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजार बंद होताच आली मोठी बातमी; उद्या Market ओपन होताच Money Rain होणार!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement