मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold And Silver Prices: सोमवारी एमसीएक्सवर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण होत गुंतवणूकदारांना जबर धक्का बसला असून, चांदी तब्बल 8,800 रुपयांनी कोसळली आहे. विक्रमी उच्चांकानंतर सुरू झालेल्या नफावसुलीमुळे आणि जागतिक घटकांच्या दबावामुळे बाजारात अस्थिरता वाढली आहे.
मुंबई: सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाली आहे. सोमवारी (16 फेब्रुवारी) एमसीएक्सवर व्यवहार सुरू होताच दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार पडझड दाखवली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला घसरणीचा ट्रेंड अजूनही कायम आहे आणि गुंतवणूकदार नफावसुलीकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.
चांदीत 8 हजारांहून अधिक घसरण
मार्च एक्सपायरीची चांदी एमसीएक्सवर तब्बल सुमारे 8,800 रुपयांनी प्रति किलो घसरली. शुक्रवारी सुमारे 2,44,000 रुपये प्रति किलोवर बंद झालेली चांदी सोमवारी थेट 2,35,500 रुपयांच्या आसपास आली.
विशेष म्हणजे 29 जानेवारीला चांदीने 4.20 लाख रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. त्या शिखराच्या तुलनेत आता दर जवळपास 1.84 लाख रुपयांनी खाली आले आहेत. अवघ्या काही आठवड्यांत इतकी मोठी घसरण झाल्याने बाजारात खळबळ उडाली आहे.
advertisement
सोन्यालाही फटका
चांदीप्रमाणेच सोन्यालाही मोठा धक्का बसला. एप्रिल एक्सपायरीचे सोने जवळपास 1,700 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले. शुक्रवारी 1,55,900 रुपयांवर बंद झालेले सोने सोमवारी सुमारे 1,54,200 रुपयांपर्यंत खाली आले. 29 जानेवारीला सोन्याने 1,93,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी स्तर गाठला होता. त्या तुलनेत आता दर सुमारे 39,000 रुपयांनी कमी झाले आहेत.
advertisement
घसरणीमागची प्रमुख कारणे
जानेवारीत विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांकडून नफावसूली
अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने मौल्यवान धातूंवर दबाव
अमेरिकेतील महागाईचा डेटा आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणाबाबत अनिश्चितता
जागतिक अर्थव्यवस्थेचे संकेत आणि चांदीसाठी औद्योगिक मागणीतील चढ-उतार
गुंतवणूकदारांनी काय करावे?
उच्च पातळीवर खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना सध्या तोटा दिसत असला, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही घसरण संधी ठरू शकते. मात्र बाजारातील अस्थिरता अजूनही कायम असल्याने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीतील ही हालचाल पुढील काही दिवसांत आणखी वेग घेऊ शकते, त्यामुळे बाजाराकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 16, 2026 4:20 PM IST
मराठी बातम्या/मनी/
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला








