Gold Silver Price : सात दिवसानंतर सोन्याच्या दरात मोठी उसळी, २ तासात घडामोड, आजचा दर काय?

Last Updated:

Gold Price : मागील जवळपास आठवडाभरापासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. मात्र, सोन्याच्या दरात आज घसरणीला ब्रेक लागला.

सात दिवसानंतर सोन्याच्या दरात मोठी उसळी, २ तासात घडामोड, आजचा दर काय?
सात दिवसानंतर सोन्याच्या दरात मोठी उसळी, २ तासात घडामोड, आजचा दर काय?
Gold Silver Price: मागील जवळपास आठवडाभरापासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. मात्र, सोन्याच्या दरात आज घसरणीला ब्रेक लागला. सोन्यााच्या दरात आज मोठी उसळण दिसून आली. अमेरिकेतील घडामोडीनंतर वायदे बाजारात सोनं-चांदीच्या दरात उलटफेर झाला होता. त्यानंतर आता सराफा बाजारातही त्याचे पडसाद दिसू लागले आहेत.
लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यानंतर आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा उलटफेर दिसून येत आहे. सोन्याच्या दरात किमान २००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज, सोमवार, १० नोव्हेंबर रोजी, २४ कॅरेट सोन्याचा भाव १९८७ रुपयांनी वाढून १२२०८७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. आता जीएसटीसह तो १२५७९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. दरम्यान, चांदी जीएसटीसह १,५५,५९४ रुपये प्रति किलो आहे. आज जीएसटीशिवाय चांदीचा दर २७०० रुपयांनी वाढला आहे आणि १,५०,९७५ रुपये प्रति किलोवर उघडला आहे.
advertisement
सोन्याने १७ ऑक्टोबर रोजी त्याचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर दरात घसरण सुरू झाली. आजच्या दरवाढीनंतर सोन्याचा दर हा उच्चांकी दरापेक्षा फक्त ८७८७ रुपये स्वस्त आहे. तर, चांदीच्या किमती १४ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा २७, १२५ रुपयांनी कमी झाल्या आहेत.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) दिवसातून दोनदा दर जाहीर करते. सोन्याचा दर एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा दर हा संध्याकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येतो.
advertisement

>> कॅरेटनुसार आजचे सोन्याचे भाव

> २३ कॅरेट सोन्याचा भाव
आज, २३ कॅरेट सोन्याचे भावही प्रति १० ग्रॅम १,२१,५९८ रुपये झाले. आज प्रति तोळा १,९७९ रुपयांनी दर वाढले. जीएसटीसह त्याची किंमत आता १,२५,२४५ रुपये झाली आहे. मेकिंग चार्जेस यात समाविष्ट नाहीत.
> २२ कॅरेट सोन्याचा भाव
२२ कॅरेट सोन्याची किंमत १,८२० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,११,८३२ रुपये झाली आहे. जीएसटीसह ती १,१५,१८६ रुपये झाली आहे.
advertisement
> १८ कॅरेट सोन्याचा भाव
१८ कॅरेट सोन्याचे भाव १,४९० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९१,५६५ रुपये झाले आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९४,३११ रुपये झाली आहे.
या वर्षी, सोने प्रति १० ग्रॅम ४६,३४७ रुपयांनी महाग झाले आहे. चांदी प्रति किलो ६४,९५८ रुपयांनी वाढली आहे.
(Disclaimer: स्पॉट गोल्ड आणि चांदीच्या किमती इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) द्वारे पोस्ट केल्या जातात. तुमच्या शहरात प्रति तोळा १,००० ते २,००० रुपयांचा फरक जाणवू शकतो.)

इतर संबंधित बातमी:

advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price : सात दिवसानंतर सोन्याच्या दरात मोठी उसळी, २ तासात घडामोड, आजचा दर काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement