advertisement

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त-चांदीचे दरही घसरले, लगेच चेक करा आजचे दर

Last Updated:

gold Silver Price Today: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान तर दागिने खरेदी करणाऱ्यांना आनंद. SGB टॅक्स सवलतीमुळे फिजिकल सोन्यावर दबाव.

News18
News18
घरच्या लेकीचं लग्न असो किंवा कष्टाच्या पैशातून केलेली छोटीशी गुंतवणूक; भारतीय कुटुंबासाठी सोनं हा फक्त धातू नाही, तर तो एक भरवसा असतो, अडीनडीच्या काळातली गुंतवणूक असते. गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या भाववाढीने सर्वसामान्यांच्या या स्वप्नांना अक्षरशः वेढून टाकलं होतं. लग्नाबस्त्याची तयारी करणाऱ्या बापाच्या काळजाचा ठोका चुकला होता, तर गुंतवणूकदारांमध्येही अस्वस्थता होती. आता गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. तर ज्यांना दागिने खरेदी करायचे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे. २ फेब्रुवारीच्या सकाळी सोन्याचे दर १ लाख ६० हजारांच्या आसपास स्थिरावले आहेत, तर चांदीच्या दरात अवघ्या दोन-तीन दिवसांत तब्बल १ लाख रुपयांची घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील मंदी, डॉलरचा वाढलेला जोर आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफा वसुली (Profit Booking) ही यामागची प्रमुख कारणे आहेत. दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव १,६०,७२० रुपये असून २२ कॅरेटसाठी १,४७,३४० रुपये मोजावे लागत आहेत.
advertisement
शहर22 कॅरेट सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर
दिल्ली147340160720
मुंबई147190160570
अहमदाबाद147240160620
चेन्नई147190160570
कोलकाता147190160570
हैदराबाद147190160570
जयपूर147340160720
भोपाळ147240160620
लखनऊ147340160720
चंडीगढ147340160720
advertisement
मागच्या तीन दिवसांमध्ये तब्बल 2 लाख रुपयांनी चांदीचे दर घसरले होते. मात्र पुन्हा हळूहळू रिकव्हरी होताना दिसत आहे. आता चांदीचे दर 1 लाख रुपयांनी घसरले आहेत. चांदीचे दर 4 लाख 20 हजारपर्यंत जाऊन आले होते. तर सोनंही 1 लाख 85 हजार रुपायांच्या आसपास गेलं होतं. मात्र हा फुगवटा फुटला आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरू या शहरांमध्ये २४ कॅरेट सोने १,६०,५७० रुपये आणि २२ कॅरेट सोने १,४७,१९० रुपयांवर आले आहे.
advertisement
इंडियन बुलियन असोसिएशनच्या नुसार
सोन्याचे दर
मुंबईसोन्याचे दरचांदीचे दर
24 कॅरेट151804275419
22 कॅरेट139140-
18 कॅरेट113777-
14 कॅरेट88376-
३० जानेवारीला हाच भाव ४ लाख रुपयांच्या पुढे गेला होता. म्हणजेच अवघ्या ४८ तासांत चांदी ५०,००० रुपयांहून अधिक स्वस्त झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव ५,०८७ डॉलर प्रति औंस आणि चांदी ९५.२६ डॉलरवर आल्याने भारतीय बाजारात पडसाद उमटले. अमेरिकन डॉलर वधारल्याने सोने-चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. अर्थमंत्र्यांनी 'सोव्हरिन गोल्ड बाँड' (SGB) वरील कॅपिटल गेन टॅक्समध्ये सवलत दिल्याने फिजिकल सोन्यावरील दबाव वाढला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त-चांदीचे दरही घसरले, लगेच चेक करा आजचे दर
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement