बाप्पाच्या आगमनाआधी स्वस्त झालं सोनं, 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर

Last Updated:

मुंबईत सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर तर 22 कॅरेट सोनं 92,310 रुपये आहे. MCX वर सोनं 99,285 रुपये, चांदी 1,13,580 रुपये. फेडरल रिझर्व्हच्या धोरणाची प्रतीक्षा.

News18
News18
मुंबई: बाप्पाच्या आगमनाआधी सोन्या चांदीचे दर स्वस्त झाले आहेत. त्यामुळे स्वस्तात सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. 1 लाख रुपयांच्या खाली सोन्याचे दर आले आहेत. 22 आणि 24 कॅरेटचे दर काय आहेत ते जाणून घेऊया. 24 कॅरेट सोन्याचे भाव GST सह 1 लाख रुपयांहून अधिक आहेत. मात्र RTGS सह सोन्याचे दर 99 हजार रुपयांवर आले आहेत. तर 23 कॅरेट सोन्याचे दर RTGS सह 98 हजार रुपयांवर आहेत. 22 कॅरेट एक तोळा सोन्याचे भाव मुंबई, चेन्नई, कोलकाता इथे 92 हजार 300 रुपये आहेत.
मुंबईत सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर प्रति तोळा आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे भाव 92 हजार 310 रुपये आहेत. चांदीबद्दल विचार करायचा झाला तर देशात एक किलो चांदीचा भाव 1 लाख 16 हजार रुपये प्रति किलो आहे. कालच्या तुलनेत चांदीच्या भावात १०० रुपयांची वाढ झाली आहे.
फ्युचर्स मार्केटमध्ये घट
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 5 ऑगस्ट 2025 रोजी संपणाऱ्या सोन्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 0.15% ची घट होऊन भाव 99,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर राहिला. त्याच वेळी, 5 सप्टेंबर 2025 च्या चांदीच्या कॉन्ट्रॅक्टमध्येही 0.11% ची घट होऊन ती 1,13,580 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
advertisement
जागतिक बाजारात काय सुरू आहे?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये थोडी घसरण दिसून आली. यूएस स्पॉट गोल्ड 0.1% ने घसरून 3,335.22 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी यूएस गोल्ड फ्युचर्स 3,378.70 डॉलर प्रति औंसवर होते. गुंतवणूकदार सध्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करत नाहीत कारण, त्यांना अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या भाषणाची प्रतीक्षा आहे. पॉवेल यांचे भाषण भारतीय वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता होईल. त्यांच्या भाषणातून व्याजदरांबाबत पुढील धोरणांचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
व्याजदरांचा सोन्यावर परिणाम
गेल्या महिन्यात फेडरल रिझर्व्हच्या दोन अधिकाऱ्यांनी नोकरीच्या बाजारात आलेल्या कमजोरीमुळे व्याजदरात 0.25% कपात करण्याची मागणी केली होती. डिसेंबरपासून फेडने व्याजदर स्थिर ठेवले आहेत. 'सीएमईच्या फेडवॉच टूल'नुसार, सप्टेंबरमध्ये व्याजदर कपातीची शक्यता 85% आहे. सामान्यतः, जेव्हा व्याजदर कमी होतात आणि आर्थिक अनिश्चितता असते, तेव्हा सोन्याची कामगिरी चांगली होते.
भारतात सोन्याचे दर का बदलतात?
भारतात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय किमती, आयात शुल्क, कर आणि डॉलर-रुपयाचा विनिमय दर यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असतात, म्हणूनच ते दररोज बदलतात.
मराठी बातम्या/मनी/
बाप्पाच्या आगमनाआधी स्वस्त झालं सोनं, 22 आणि 24 कॅरेटचे नवे दर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement