EPFO च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! लवकरच वाढणार व्याजदर, किती वाढणार इथे पाहा कॅल्क्युलेशन

Last Updated:

सरकार पीएफवरील व्याजदर वाढवण्याच्या विचारात आहे. २८ फेब्रुवारी रोजी ईपीएफओची बैठक होणार असून, निर्णय अपेक्षित आहे. यावेळी ०.१० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

ईपीएफओ
ईपीएफओ
तुम्ही EPFO चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नोकरदारांसाठी आता EPFO कडून गुडन्यूज आहे. पगारदार वर्गासाठी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) ही एक मोठी आर्थिक मदत असते. या बचतीवर सरकार दरवर्षी व्याज देतं. आता सरकार पीएफवरील व्याज वाढवण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.
सरकारकडून मध्यमवर्गाला दिलासा
सरकार मध्यमवर्गाचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. अर्थसंकल्पात कर कपात, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये कपात अशा अनेक गोष्टींमुळे मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे. आता पीएफ व्याजदरात वाढ झाली तर त्यात आणखी भर पडेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
ईपीएफओच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफशी संबंधित सर्व निर्णय घेतले जातात. 28 फेब्रुवारी रोजी ईपीएफओची बैठक होणार असून, त्यात व्याजदराबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
 गेल्या दोन वर्षांतही वाढ
सरकारने गेल्या दोन वर्षातही पीएफवरील व्याजदर वाढवले आहेत. २०२२-२३ मध्ये पीएफवर ८.१५ टक्के व्याज दिले जात होते. २०२३-२४ मध्ये हा दर वाढवून ८.२५ टक्के करण्यात आला.
किती वाढ होऊ शकते?
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पीएफ व्याजदरात ०.१० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर पीएफ धारकांसाठी ही आनंदाची बातमी ठरेल.
advertisement
मराठी बातम्या/मनी/
EPFO च्या ग्राहकांसाठी गुडन्यूज! लवकरच वाढणार व्याजदर, किती वाढणार इथे पाहा कॅल्क्युलेशन
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement