Market मधील गुंतवणुकीवर मिळणार Discounts; रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी सरकारचा ‘सरप्राइज गिफ्ट’, कोण पात्र?

Last Updated:

Debt Market: केंद्र सरकार डेट मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठं पाऊल उचलत आहे. महिलांना, वरिष्ठ नागरिकांना आणि नव्या गुंतवणूकदारांना बॉण्ड खरेदीवर कॅशबॅक, डिस्काउंट आणि जास्त व्याजदराचा फायदा देण्याचा सेबीचा नवा प्रस्ताव चर्चेत आला आहे.

News18
News18
मुंबई: केंद्र सरकार लवकरच डेट मार्केटमध्ये (Debt Market) गुंतवणूक करणाऱ्या वरिष्ठ नागरिकांना, महिलांना आणि किरकोळ गुंतवणूकदारांना विशेष सवलत (डिस्काउंट) देण्याच्या तयारीत आहे. सोमवारी SEBIने या संदर्भात एक प्रस्ताव जारी केला आहे. या योजनेद्वारे, बॉण्ड जारी करणाऱ्या कंपन्या किंवा सरकार काही निवडक प्रकारच्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर अधिक व्याजदर किंवा इश्यू किंमतीत (Issue Price) सवलत देऊ शकतील.
advertisement
सरकार सवलत का देत आहे?
डेट मार्केट म्हणजे असा बाजार जिथे कंपन्या किंवा सरकार पैसे उधार घेण्यासाठी बॉण्ड्स जारी करतात. उदाहरणार्थ: गोल्ड बॉण्ड हे याच प्रकारात मोडतात. या बाजाराची अडचण अशी आहे की, येथे सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग खूपच कमी आहे. विशेषतः सेकंडरी मार्केटमध्ये जिथे आधी जारी केलेले बॉण्ड्स विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी उपलब्ध असतात.
advertisement
या बाजारात लिक्विडिटी (Liquidity) कमी असल्यामुळे बॉण्ड्स विकणे कठीण होते. यावर उपाय म्हणून सेबीने एक योजना तयार केली आहे. ज्यामध्ये बॉण्ड्स जारी करणाऱ्या कंपन्या काही गुंतवणूकदारांना इन्सेंटिव्ह (Incentive) देऊ शकतील, जसे की...
advertisement
-कॅशबॅक (Cashback)
-फीमध्ये सवलत (Discount in charges)
-किंवा इतर आर्थिक फायदे.
या योजनेचा उद्देश म्हणजे डेट मार्केटमध्ये रिटेल (किरकोळ) गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवणे.
कॅशबॅक किंवा डिस्काउंटच्या स्वरूपात मिळणार प्रोत्साहन
advertisement
सेबीच्या या नव्या प्रस्तावानुसार कंपन्या लाँग-ड्युरेशन बॉण्ड्स (म्हणजे 5 ते 10 वर्षांच्या मुदतीचे बॉण्ड्स) खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना अशा प्रकारचे प्रोत्साहन देऊ शकतील.
या प्रोत्साहनांमध्ये समावेश असेल
कॅशबॅक (थोडी रक्कम परत देणे)
फी किंवा चार्जेसमध्ये सवलत देणे
advertisement
किंवा इतर लाभ देणे.
मात्र ही सवलत किंवा जास्त व्याजदर फक्त त्या गुंतवणूकदारांना मिळेल जे पहिल्यांदा बॉण्ड खरेदी करतील. जर त्यांनी नंतर हे बॉण्ड्स इतरांना विकले, तर दुसऱ्या खरेदीदाराला ही सवलत किंवा जास्त व्याजदर लागू होणार नाही.
advertisement
सध्याचे नियम आणि बदल
आत्ताच्या सेबीच्या नियमांनुसार कोणतीही बॉण्ड जारी करणारी कंपनी किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्ती गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा इनाम, भेट किंवा सवलत देऊ शकत नाही. मात्र नव्या प्रस्तावामुळे विशिष्ट वर्गातील गुंतवणूकदारांना जसे की महिला, वरिष्ठ नागरिक आणि रिटेल इन्व्हेस्टर्स मर्यादित सवलत किंवा इन्सेंटिव्ह देण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. ही योजना लागू झाल्यास डेट मार्केटमध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास आणि सहभाग वाढेल, असा सेबीचा अंदाज आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Market मधील गुंतवणुकीवर मिळणार Discounts; रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी सरकारचा ‘सरप्राइज गिफ्ट’, कोण पात्र?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement