सरकारचा कठोर आदेश! डिसेंबरपूर्वी Pan-Aadhaar Card करा लिंक, अन्यथा वाढतील अडचणी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Link Pan-Aadhaar Card: तुमचा आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे आता सर्वांसाठी अनिवार्य आहे. जर तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत हे केले नाही, तर तुमचा पॅन जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतो. म्हणून, विलंब न करता, तुमच्या मोबाईलवरून काही मिनिटांत तुमचा आधार आणि पॅन कार्ड लिंक करा आणि तुमच्या सर्व आवश्यक सेवा चालू ठेवा.
Link Pan & Aadhaar Card: तुम्ही अद्याप तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक केले नसेल. तर तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की जर तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत लिंकिंग प्रोसेस पूर्ण केली नाही, तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे कारण एकदा तुमचा पॅन निष्क्रिय झाला की, तुमचे सर्व आर्थिक व्यवहार आणि कायदेशीर काम थांबेल. यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात. चला या नियमाची प्रोसेस सविस्तरपणे समजावून घेऊया.
तुम्ही तुमचा पॅन आणि आधार लिंक केला नाही तर काय होईल?
तुम्ही 31 डिसेंबर 2025 च्या अंतिम मुदतीपर्यंत तुमचा पॅन तुमच्या आधार कार्डशी लिंक केला नाही. तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. ज्याचा थेट तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम होईल. तुम्ही तुमचे आयकर रिटर्न (ITR) भरू शकणार नाही.
advertisement
तुम्हाला बँक अकाउंट उघडण्यात, मोठे बँक व्यवहार करण्यात किंवा कोणतीही गुंतवणूक करण्यात अडचणी येतील. तुमचा पॅन क्रमांक ओळखीचा पुरावा म्हणून अवैध ठरेल. ओळखीची फसवणूक आणि आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
PAN आणि Aadhaar लिंक करण्याचा सर्वात सोपा मार्ग
advertisement
तुम्ही 31 मार्च 2023 च्या अंतिम मुदतीपूर्वी तुमचा पॅन आणि आधार लिंक केला नसेल, तर आता तुम्हाला ₹1,000 भरावे लागू शकतात. तुम्ही या सोप्या स्टेप्स फॉलो करून काही मिनिटांत घरी बसून लिंकिंग प्रोसेस पूर्ण करू शकता:
1. तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉपवर आयकर विभागाची अधिकृत ई-फायलिंग वेबसाइट, https://www.incometax.gov.in उघडा.
advertisement
2. होमपेजवरील “Link Aadhaar” टॅबवर क्लिक करा. तुमचा पॅन नंबर, आधार नंबर आणि नाव येथे एंटर करा.
3. तुमच्या आधार किंवा पॅन कार्डवर रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करा. त्या नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. तो एंटर करा आणि 'Validate' वर टॅप करा.
4. तुम्ही 31 मार्च 2023 पूर्वी दोन्ही डॉक्यूमेंट्स लिंक केली नसतील, तर तुम्हाला Net Banking/ UPI/ Credit Card/ Debit Cardद्वारे ऑनलाइन ₹1,000 चा लिंकिंग शुल्क भरावा लागेल.
advertisement
5. पेमेंट आणि ओटीपी व्हेरिफिकेशननंतर, 'Link Aadhaar' बटणावर क्लिक करा.
लिंकिंग प्रोसेस यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, स्क्रीनवर 'Your Aadhaar is successfully linked with PAN' असा संदेश दिसेल. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे.
advertisement
view comments
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 03, 2025 6:30 PM IST











