HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ऑनलाईन पेमेंट होणार नाही? काय आहे कारण
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
HDFC बँकेने 22 ऑगस्ट रात्री 11 ते 23 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत काही सेवा तात्पुरत्या बंद ठेवणार आहे. ग्राहकांनी महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करावेत. मेंटेनन्समुळे सेवा सुधारली जाईल.
मुंबई: HDFC बँकेत तुमचं खातं असेल किंवा तुम्ही त्यावरुन व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने जाहीर केले आहे की 22 ऑगस्ट रोजी पेमेंट होणार नाही. तुम्ही पैसे ट्रान्सफर करणार असाल तर ते होणार नाहीत. त्यामुळे आधीच पैसे काढून ठेवा किेंवा पर्याय दुसरा शोधा.
रोजी रात्री 11 वाजता पासून 23 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 7 तास काही सेवा तात्पुरत्या बंद राहणार आहेत. कारण, या वेळेत बँक आपल्या सिस्टीमचे मेंटेनन्स करून सेवा अधिक चांगल्या आणि वेगानं करण्यासाठी काम करणार आहे.
काय बंद राहणार?
या दरम्यान ग्राहक सेवा विभागातील काही महत्त्वाच्या सुविधा थांबतील –
advertisement
फोन बँकिंगचा IVR, ईमेल सेवा
सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवरील चॅटबँकिंग
एसएमएस बँकिंग
जर तुमचे खाते किंवा कार्ड हॉटलिस्ट करायचे असेल, तर त्यासाठी असलेला टोल-फ्री क्रमांक सुरू राहणार आहे.
काय सुरू राहणार?
या ७ तासांतही काही सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, जसे की...
फोनबँकिंग एजंट सेवा
नेटबँकिंग
मोबाईल बँकिंग
पेझॅप आणि मायकार्ड्स अॅप्स
advertisement
ग्राहकांनी काय करावे?
जर तुम्हाला महत्त्वाचे बँकिंग व्यवहार करायचे असतील, तर ते 22 ऑगस्ट रात्री 11 वाजण्यापूर्वीच पूर्ण करणे चांगले. अचानक पैशांची गरज पडल्यास गैरसोय होऊ नये म्हणून ही खबरदारी आवश्यक आहे.
HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना या काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, “ही तात्पुरती असुविधा भविष्यातील अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा देण्यासाठी आहे,” असे बँकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीमध्ये फोन पे, जीपे, नेट बँकिंगचा सर्व्हर देखील डाऊन राहण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 15, 2025 10:44 AM IST


