भाड्याच्या घरासाठी TDS चा मोदी सरकारने बदलला नियम, कसा होणार फायदा?

Last Updated:

लहान करदात्यांची सोय होईल. घराचा मालक आणि भाडेकरू या दोघांनाही या नव्या नियमाचा कसा फायदा होईल हे जाणून घेऊ या.

News18
News18
केंद्र सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी 25 ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केला. या बजेटकडून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करत सीतारामन यांनी 12 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना करातून सूट दिली आहे. त्याचबरोबर अनेक घोषणा करण्यात आल्या त्यापैकी एक म्हणजे भाडेतत्त्वावर दिलेल्या घराच्या मिळणाऱ्या भाड्यावरील टीडीएसमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि भाड्यातूनच कमाई करणाऱ्यांना खूप सोयीचं होणार आहे. सरकारने घरभाड्याच्या रकमेवरील टीडीएसची मर्यादा वार्षिक 2.4 लाख रुपयांवरून वाढवून 6 लाख रुपये केली आहे. अर्थमंत्री सीतारामन आपल्या बजेटच्या भाषणात म्हणाल्या होत्या की, या बदलामुळे TDS अंतर्गत होणाऱ्या ट्रॅन्झॅक्शनची संख्या कमी होईल. त्यामुळे लहान करदात्यांची सोय होईल. घराचा मालक आणि भाडेकरू या दोघांनाही या नव्या नियमाचा कसा फायदा होईल हे जाणून घेऊ या.
असा होईल परिणाम
समजा तुमचं एक घर भाड्याने दिलं आहे आणि भाड्यापोटी तुम्हाला वार्षिक 2.4 लाख रुपयांहून अधिक रक्कम मिळते आहे. सध्याच्या नियमानुसार तुमच्या भाडेकरूचा त्यावर TDS कापला जायचा. आता तो पूर्ण रक्कम तुम्हाला भाडं म्हणून देईल म्हणजे टीडीएसमुळे कमी होणारी रक्कमही तुम्हाला मिळेल. त्याचं कारण वार्षिक घरभाड्यावरच्या टीडीएसची मर्यादा सरकारने 6 लाख रुपये केली आहे. त्यामुळे भाडेकरूला कर पडणार नाही आणि तुम्हाला पूर्ण रक्कम मिळेल.
advertisement
तर भरावा लागेल टीडीएस
आता समजा, एखादा भाडेकरू ज्या घरात राहतो त्याचं वार्षिक भाडं 6 लाख रुपयांहून अधिक असेल तर त्याला टीडीएस भरावा लागेल आणि मगच घरमालकाला भाड्याची रक्कम देता येईल. म्हणजे टीडीएस भरण्याची जबाबदारी भाडेकरूची असेल. FY19 पर्यंत घरभाड्यावर टीडीएसमधील सूटीची मर्यादा 1.8 लाख रुपये होती. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जो भाडेकरू वर्षाला 6 लाख रुपयांहून अधिक भाडं घरमालकाला देतो आहे त्याचा 10 टक्के टीडीएस कापला जाईल. जर घरमालकाकडे पॅन कार्ड नसेल तर भाड्याच्या रकमेच्या 20 टक्के टीडीएस भरावा लागेल.
advertisement
दिल्ली, मुंबईकरांना होणार फायदा
करतज्ज्ञांचं मत आहे की, केंद्रीय अर्थसंकल्पात टीडीएससंबंधी नियमांत केलेल्या बदलामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. गेल्या काही वर्षांत घरभाड्याची रक्कम वेगाने वाढली आहे. त्यामुळे दरमह 20,000 रुपयांहून अधिक भाडं असेल तर भाडेकरूचा टीडीएस कापला जातो. त्यामुळे कम्प्लायन्स वाढतो. आता दरमहा 50,000 रुपयांपर्यंत भाडं भरावं लागलं तरीही टीडीएस कापला जाणार नाही. या बदलामुळे दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांत भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना खूप मोठी सवलत मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
भाड्याच्या घरासाठी TDS चा मोदी सरकारने बदलला नियम, कसा होणार फायदा?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement