EPFO updates : घरबसल्या UAN नंबर कसा Active करायचा?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
EPFO updates : घरबसल्या UAN नंबर कसा Active करायचा? अगदी सोप्या शब्दात समजून घ्या
मुंबई, 2 ऑगस्ट : नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमच्या पगारातून EPFO साठी पैसे कापले जातात. मात्र ते कुठे जमा होतात, ते समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला UAN नंबर लागतो. हा नंबर अॅक्टिवेट असेल तर तुमच्या खात्यावर किती पैसे जमा होतात ते तुम्हाला दिसू शकतं. हा नंबर कसा अॅक्टिवेट करायचा आणि तुमच्या खात्यावर किती रक्कम जमा झाली आहे ते पाहायचं जाणून घ्या.
खासगी किंवा सरकारी कर्मचाऱ्यासाठी EPFO खातं काढलं जातं. यासाठी एक विशिष्ट नंबर प्रत्येक कर्मचाऱ्याला दिला जातो. त्याला UAN नंबर असं म्हणतात. UAN नंबर म्हणजे त्या माणसाची ओळख असते. हा १२ अंकी नंबर असतो. जो EPFO कडून दिला जातो. युनिव्हर्सल अकाउंट नंबर हे असे खाते आहे ज्यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) जमा केला जातो.
advertisement
कसा शोधायचा तुमचा UAN नंबर
यासाठी तुम्हाला www.epfindia.gov.in या EPFO च्या ऑफिशियल साईटवर भेट द्यावी लागणार आहे. होम पेजवर Services हा पर्याय निवडा. तिथे For Employees असं लिहिलेलं असेल, त्यावर क्लीक करा. Member UAN/Online Service (OCS/OTCP) हा पर्याय निवडा.
नवीन पेज सुरू होईल. त्याच्या उजव्या बाजूला दिलेल्या महत्त्वाच्या लिंक्सवर जा आणि Know your UAN वर क्लिक करा. पुन्हा तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, तुमचा आधारलिंकशी जोडलेला मोबाईल नंबर तिथे टाका आणि कॅप्चर कोड लिहा आणि सबमिट करा.
advertisement
UNA नंबर अॅक्टिवेट कसा करायचा?
यासाठी तुम्हाला www.epfindia.gov.in या EPFO च्या ऑफिशियल साईटवर भेट द्यावी लागणार आहे.
होम पेजवर Services हा पर्याय निवडा. तिथे For Employees पर्यायावर क्लिक करा.
तिथे खाली तुम्हाला UAN / ऑनलाइन सेवा असा पर्याय दिसेल
तिथे अॅक्टिव्हेट UAN च्या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा UAN क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि कॅप्चर कोड अपलोड करा. Get Authorization Pin वर क्लिक करा.
advertisement
मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. तो अपलोड करा त्यानंतर Agree वर क्लिक करा. यानंतर UAN अॅक्टिवेट होईल.
UAN क्रमांक अॅक्टिवेट होण्यासाठी साधारण 6 तास लागतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 02, 2023 12:56 PM IST










