LIC पॉलिसी सरेंडर करायचीये का? पाहा किती होईल नुकसान आणि समजून घ्या पूर्ण नियम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
LIC पॉलिसी मध्यभागी संपुष्टात आणणे याला पॉलिसी सरेंडर करणे म्हणतात. तुम्ही किमान 3 वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करू शकता.
मुंबई : कोरोनानंतर एलआयसीच्या जीवन विमा पॉलिसीच्या सरेंडर दरात वाढ झाली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, 2020-21 मध्ये, पॉलिसीच्या सरेंडरचा दर पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. जर तुम्ही आर्थिक संकटामुळे पॉलिसी सरेंडर करण्याचा विचार करत असाल तर आधी नियम आणि कायदे जाणून घ्या.
LIC पॉलिसी मध्यभागी संपुष्टात आणणे याला पॉलिसी सरेंडर करणे म्हणतात. तुम्ही किमान 3 वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करू शकता. जर तुम्ही 3 वर्षापूर्वी केले तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत.
सरेंडर व्हॅल्यू
पॉलिसी सरेंडर केल्यावर, तुम्हाला एलआयसीच्या नियमांनुसार सरेंडर व्हॅल्यू मिळते. याचा अर्थ, जर तुम्ही पॉलिसी बंद करण्याचा किंवा LIC मधून पैसे काढण्याचा निर्णय घेतला, तर तुम्हाला त्याच्या मूल्याएवढी रक्कम परत मिळते त्याला सरेंडर व्हॅल्यू म्हणतात. तुम्ही पूर्ण तीन वर्षांसाठी एलआयसीचा प्रीमियम भरला असेल, तरच तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू मिळू शकेल.
advertisement
किती पैसे परत मिळतात?
पॉलिसी सरेंडर केल्याने खूप नुकसान होते. जर तुम्ही सलग 3 वर्षे प्रीमियम भरला असेल तर तुम्ही सरेंडर व्हॅल्यूसाठी पात्र आहात. त्यानंतर तुम्हाला भरलेल्या प्रीमियमच्या फक्त 30 टक्के मिळतात परंतु पहिल्या वर्षासाठी प्रीमियम वगळून. म्हणजे पहिल्या वर्षी तुम्ही भरलेले प्रीमियम पैसेही शून्य होतात. अशा प्रकारे, उर्वरित दोन वर्षांसाठी 30 टक्के उपलब्ध होईल. यात रायडर्ससाठी भरलेला कोणताही अतिरिक्त प्रीमियम, कर आणि LIC कडून मिळालेला कोणताही बोनस समाविष्ट नाही.
advertisement
पॉलिसी सरेंडर करण्यासाठी LIC सरेंडर फॉर्म आणि NEFT फॉर्म आवश्यक आहे. या फॉर्म्ससोबत तुम्हाला तुमच्या पॅन कार्डची आणि मूळ पॉलिसी कागदपत्रांची प्रत जोडावी लागेल. हाताने लिहिलेल्या पत्रासोबत तुम्ही पॉलिसी का सोडत आहात हे स्पष्ट करावे लागेल.
कोणत्या कागदपत्रांची गरज आहे?
>> ओरिजनल पॉलिसी बाँड दस्तऐवज
>> एलआयसी पॉलिसी सरेंडर फॉर्म क्रमांक 5074
advertisement
>> बँक खाते तपशील
>> LIC चा NEFT फॉर्म (जर तुम्ही सरेंडर फॉर्म वापरत नसाल).
>> ओरिजनल ओळखपत्र जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2023 2:43 PM IST