Income Tax विभागाकडून मोठी चूक, लाखो करदात्यांना फटका; 'डॅमेज कंट्रोल' साठी Deadline वाढवली

Last Updated:

ITR News: आयकर विभागाने अनेक करदात्यांचे रिटर्न तांत्रिक चुका म्हणून चुकीच्या पद्धतीने अमान्य ठरवले होते. या समस्येवर तोडगा काढत CBDT ने एक नवा सर्क्युलर जारी करत 2026 पर्यंतची प्रोसेसिंग मुदत वाढवली आहे.

News18
News18
नवी दिल्ली: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) ने एक सर्क्युलर जारी करत आयकर विवरणपत्र (ITR) प्रोसेसिंगसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. बेंगळुरू येथील इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (CPC) कडून काही रिटर्न चुकीने अमान्य ठरवले गेले होते. अशा रिटर्नच्या प्रक्रियेसाठी आता CBDT ने मुदतवाढ दिली आहे.
आयकर सर्क्युलर जारी
CBDT ने सर्क्युलरमध्ये स्पष्ट केलं आहे की 31 मार्च 2024 पर्यंत इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भरलेले ITR सिस्टीममधील तांत्रिक त्रुटींमुळे चुकीने अमान्य ठरवले गेले होते. या तांत्रिक चुकांमुळे अनेक करदात्यांना रिफंड आणि इतर प्रक्रियांमध्ये उशीर सहन करावा लागला. कारण ही दुरुस्ती करण्याची मूळ वेळ मर्यादा आधीच — म्हणजे AY 2023-24 साठी 31 डिसेंबर 2024 — संपली होती. यावर उपाय म्हणून CBDT ने आयकर अधिनियम, 1961 च्या कलम 119 अंतर्गत वेळेची सवलत दिली आहे.
advertisement
आयकर रिटर्न नियम
आता अशा सर्व ITR ची प्रक्रिया पुन्हा केली जाईल आणि करदात्यांना 31 मार्च 2026 पर्यंत याबाबत माहिती दिली जाईल. पात्र करदात्यांना रिफंडही देण्यात येईल, तोसुद्धा व्याजासह. मात्र यासाठी पॅन-आधार लिंकिंग आवश्यक आहे. जर पॅन आणि आधार लिंक नसेल, तर 28 मार्च 2023च्या मागील सर्क्युलरप्रमाणे रिफंड दिला जाणार नाही.
advertisement
करदात्यांसाठी आवश्यक सूचना
या दिलास्यामुळे अनेक अशा करदात्यांना फायदा होणार आहे. ज्यांचे रिटर्न तांत्रिक चुका असल्यामुळे अडकले होते. करदात्यांनी पॅन-आधार लिंक केल्याची खात्री करावी, जेणेकरून रिफंडसंदर्भात अडथळे येणार नाहीत.
इनकम टॅक्स विभागाची सखोल तपासणी
इनकम टॅक्स विभागाने सध्या कॅपिटल गेन रिपोर्टिंगची तपासणी तीव्र केली आहे. इक्विटी, म्युच्युअल फंड किंवा बायबॅक व्यवहारांतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या अपूर्ण किंवा चुकीच्या खुलाशांचा शोध घेण्यासाठी डेटा मॅचिंग सिस्टीमचा वापर केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Income Tax विभागाकडून मोठी चूक, लाखो करदात्यांना फटका; 'डॅमेज कंट्रोल' साठी Deadline वाढवली
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement