Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल नाही पण...' आदिती तटकरे स्पष्टच बोलल्या
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Ladki Bahin Yojana 6th Installment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे निकष आणि नियम कठोर केले जाणार आहेत. तर अदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी होणार नाही.
मुंबई : महायुतीचं सरकार आलं, मंत्रिमंडळ विस्तार 15 डिसेंबरपर्यंत होणार आहे. मात्र लाडकी बहीण योजनेबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. प्रत्येक जण वेगवेगळं बोलत असल्याने नक्की चाललंय काय असा प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पडला आहे. 2100 रुपयांसाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. तर 1500 रुपये लाभार्थी महिलांना मंत्रिमंडळ विस्तारानंतर मिळतील.
दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचे निकष आणि नियम कठोर केले जाणार आहेत. तर अदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी होणार नाही. मात्र आता काही जिल्ह्यांमध्ये अर्जांची छाननी सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ज्या ज्या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत तिथे अर्ज आणि कागदपत्रांची उलटतपासणी पुन्हा सुरू झाली आहे.
advertisement
राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजना प्रचंड चर्चेत आली आहे. ही योजना महायुतीसाठी खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरली खरी मात्र आता याच योजनेतील निकष आणि लाभार्थी महिलांचे अर्ज, कागदपत्र पुन्हा तपासले जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर आमदार आदिती तटकरे यांनी स्पष्ट उत्तर दिलं.
advertisement
सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचं, लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेजही फिरत आहेत. त्यामुळे, लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालाय. माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदिती तटकरे यांनी अशा मेसेजवर विश्वास ठेवू नये असं स्पष्टच सांगितलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या माहितीची योग्य ती पडताळणी केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असं त्यांनी सांगितलं. निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेज किंवा व्हिडीओवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महिलांना केलं आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 12, 2024 8:37 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल नाही पण...' आदिती तटकरे स्पष्टच बोलल्या