Shocking News : डॉक्टरच निघाले कसाई! बाप-लेकाला गाठले अन्....; डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Last Updated:
MBBS Russia Admission Fraud : रशियात एमबीबीएस प्रवेश मिळवून देतो असे सांगून डोंबिवलीतील विद्यार्थ्याकडून 23 लाख रुपये उकळण्यात आले. प्रवेश न झाल्याने पालकांनी तक्रार केली असून चार डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
डोंबिवली : रशियात एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून डोंबिवलीतील एका विद्यार्थ्याची आणि त्याच्या वडिलांची तब्बल 23 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय प्रवेशाच्या नावाखाली रचला होता कट
डोंबिवली पूर्व येथे राहणारे संदेश विलास फडतरे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार स्टडी हब पॅलेस या संस्थेच्या चार डॉक्टरांनी रशियातील ओरनबर्ग स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे एमबीबीएस प्रवेश निश्चित करून देण्याचे आश्वासन दिले होते.
अॅडमिशनच्या नावाखाली रिकामा केला खिसा
या प्रवेश प्रक्रियेसाठी फडतरे कुटुंबाकडून 23 लाख 8 हजार 617 रुपये घेण्यात आले. यापैकी 7 लाख 69 हजार 538 रुपये ही रक्कम प्रत्यक्ष रशियातील विद्यापीठात भरली गेली. मात्र उर्वरित 15 लाख 39 हजार रुपये स्टडी हब पॅलेसच्या संचालकांनी विद्यापीठात जमा केलेच नाहीत.
advertisement
प्रवेशाबाबत वारंवार चौकशी करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संदेश फडतरे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे डॉ. आशीष पत्रा, डॉ. शुभम, डॉ. राकेश सिंग आणि डॉ. मयांक राज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 10:59 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking News : डॉक्टरच निघाले कसाई! बाप-लेकाला गाठले अन्....; डोंबिवलीतील धक्कादायक घटना










