LIC सोबत जोडलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; कंपनी लवकरच घेणार मोठा निर्णय

Last Updated:

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. देशभरात त्यांचे कोट्यवधी पॉलिसी होल्डर्स आहेत. आता एलआयसीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

News18
News18
मुंबई : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. देशभरात त्यांचे कोट्यवधी पॉलिसी होल्डर्स आहेत. आता एलआयसीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. एलआयसी देशातील मेट्रो शहरांमधील रिअल इस्टेट मालमत्ता विकण्याची तयारी करत आहे. या मालमत्तेच्या विक्रीतून एलआयसी सहा ते सात बिलियन डॉलर रक्कम उभी करण्याची योजना आखत आहे. यासाठी कंपनी आपले प्लॉट आणि कमर्शियल इमारती विकणार आहे. एलआयसीने मालमत्तेच्या विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी इंटर्नल टीमला सूचना दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसी मुंबईतील आपली मालमत्ता विकून या प्रक्रियेची सुरूवात करणार आहे.
आपण एलआयसीच्या काही मौल्यवान संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील जीवन भारती बिल्डिंग, कोलकाता येथील चित्तरंजन अव्हेन्यू येथील एलआयसी बिल्डिंग आणि मुंबईतील एशियाटिक सोसायटी आणि अकबर रॅलीतील एका हाउसिंग प्रॉपर्टीचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, अंतिम व्हॅल्युएशनदरम्यान, या मालमत्तेची एकूण किंमत 50-60 हजार कोटी रुपयांदरम्यान आहे, असं म्हटलं जात आहे. यासोबतच एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा इन्शुरन्स प्रदाता आणि स्टॉक मार्केटमधील सर्वाधिक गुंतवणूक करणारी कंपनी आहे.
advertisement
एलआयसीच्या संपत्तीचं मूल्यांकन केलं जाणार
सार्वजनिक क्षेत्रातील या विमा कंपनीकडे 51 ट्रिलियन रुपयांची मालमत्ता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्री प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कंपनी आपल्या मालमत्तेचं मूल्यांकन सुरू करू शकते. एलआयसीने त्यांच्या अनेक मालमत्तांचं मूल्यांकन अजून केलेलं नाही आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे की या मालमत्तेचं मूल्य त्यांच्या वास्तविक किमतीपेक्षा पाचपट जास्त असेल. म्हणजेच हा आकडा अडीच ते तीन ट्रिलियन रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.
advertisement
एलआयसीचा नफा गेला 40 हजार कोटींच्या पार
2023-24 या आर्थिक वर्षात एलआयसीचा नफा 40,676 कोटी रुपये होता. सार्वजनिक क्षेत्रातील ही कंपनी भारतात जमिनीच्या मालकीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या बाबतीत भारतीय रेल्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. एलआयसी आपल्या मालमत्तेचे व्यवस्थापन आणि विक्रीसाठी एक नवीन संस्था तयार करू शकते, अशी देखील माहिती आहे.
मराठी बातम्या/मनी/
LIC सोबत जोडलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; कंपनी लवकरच घेणार मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement