शेअर बाजारात 150 कोटींचा घोटाळा; कुठलाही पुरावा नाही, सगळा पैसा गायब, मुंबईसह अनेक शहरात भयानक Prop Trading जाळं
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market: शेअर बाजारातील प्रॉप ट्रेडिंगच्या नावाखाली देशभरात मोठा घोटाळा उघड झाला आहे. KYC, करारपत्र किंवा कोणताही पुरावा नसताना एजंट आणि ब्रोकर्सनी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले.
मुंबई: शेअर बाजारात असा एक घोटाळा समोर आला आहे. ज्यात ना कुठलाही करारपत्र आहे, ना KYC, आणि ना कोणतं अधिकृत रेकॉर्ड. सगळं काही केवळ विश्वासावर चालत होतं आणि तो विश्वास तुटताच कोट्यवधी रुपये हवेत गायब झाले. Moneycontrol च्या एका तपासानंतर उघड झालं की- देशातील अनेक शहरांमध्ये ट्रेडर्सना “हाय लिव्हरेज आणि मोठा नफा” दाखवून फसवलं जात होतं. लोकांना वाटत होतं की ते प्रोफेशनल ‘प्रॉप ट्रेडिंग’ करत आहेत, पण प्रत्यक्षात त्यांचे पैसे कुठल्याही दस्तऐवजाशिवाय एजंट आणि ब्रोकर्स यांच्या हातांमधून फिरत होते. आणि आता हेच प्रकरण तब्बल 150 कोटी रुपयांच्या स्कॅमच्या रूपात समोर आलं आहे.
advertisement
प्रॉप ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय?
प्रॉप ट्रेडिंग (Prop Trading) म्हणजे ब्रोकरेज कंपनी स्वतःच्या पैशाने ट्रेडिंग करणं. SEBI च्या नियमानुसार ही सुविधा फक्त ब्रोकर्ससाठी असते, सामान्य लोकांसाठी नाही. म्हणजेच ब्रोकर्सना स्वतःच्या भांडवलाने ट्रेडिंग करण्याची परवानगी आहे. बाहेरील गुंतवणूकदारांचे पैसे वापरून नाही.
advertisement
मग हा स्कॅम झाला तरी कसा?
प्रत्यक्ष मात्र चित्र अगदी उलट होतं. ब्रोकर्सनी एजंटांच्या माध्यमातून रिटेल गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले आणि ते पैसे Prop Account मध्ये फिरवले. ना कुठली KYC, ना कोणतं कागदपत्र, ना कोणतं एग्रीमेंट सगळं काही WhatsApp आणि फोन कॉलवर ठरत होतं.
advertisement
लोकांना सांगितलं जायचं-तुम्ही फक्त पैसे द्या, आम्ही तुम्हाला लिव्हरेज देऊ. प्रॉफिट आला तर हिस्सा तुमचाही. म्हणजेच पूर्ण सिस्टीमच विश्वास या एका अंधाऱ्या आधारावर उभी होती.
पैसे कसे घेतले जात होते?
advertisement
कधी UPI द्वारे, कधी दुसऱ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर करून, तर कधी थेट कॅशमध्ये. याचा अर्थ पैसा अधिकृत ब्रोकरेज अकाउंटमध्ये कधीच जात नव्हता. त्यामुळे कोणताही पेपर ट्रेल अस्तित्वातच नव्हता.
इतकी leverage मिळायची तरी कशी?
advertisement
एजंट ब्रोकर्ससोबत एक अनौपचारिक सेटिंग करत. उदाहरणार्थ: तुम्ही मला 4% वर leverage द्या, मी पुढे 6% वर देतो. म्हणजे एजंटला मध्येच कमिशन मिळायचं. गुंतवणूकदार 1 कोटी रुपये जमा करतो. त्याला सांगितलं जातं, आता तुला 7 कोटींची ट्रेडिंग लिमिट मिळेल. तो विचार करतो, “वा! मोठा मौका आहे आणि तिथेच सापळ्यात अडकतो.
advertisement
नफा होत असताना सगळे खुश का असतात?
कारण ब्रोकर्सना brokerage + interest मिळतं, एजंटला कमिशन, आणि ट्रेडरला प्रॉफिट. पण जशीच एक मोठी लॉस ट्रेड लागते. सगळे हात वर करतात- आम्हाला माहित नाही, ती तुमची जबाबदारी होती. त्या वेळी कोणतं agreement, कोणती सिग्नेचरड डॉक्युमेंट्स असतातच नाहीत.
नुकसान कोणाचं होतं?
नुकसान नेहमीच ट्रेडरचं होतं. त्याचे पैसे अडकतात. अशा वेळी ब्रोकर्स म्हणतो- पैसे जमा झालेच नव्हते. एजंट गायब होतो. कारण ना कागद, ना KYC. त्यामुळे कायदेशीर कारवाई करणेही शक्य होत नाही.
SEBI काही करत नाही का?
SEBI चे नियम अगदी स्पष्ट आहेत. Prop Account = फक्त ब्रोकर्सचा पैसा आणि Public money pooling = कायदेशीर गुन्हा. तरीसुद्धा हे मॉडेल दिल्ली-NCR, मुंबई, राजस्थान, गुजरात आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये धडधडीत चालत होतं.
लोक फसले कसे?
Telegram / WhatsApp ग्रुप्सवर खोट्या स्क्रिनशॉट्स शेअर केले जात होते. Instagram / YouTube वर क्विक रिटर्न्स चं आमिष दाखवलं जायचं. बनावट P&L स्क्रीनशॉट्स टाकून विश्वास मिळवला जायचा. आणि एकच मंत्र Profit मध्ये सगळे आपले, Loss मध्ये कोण ओळखत नाही.
प्रॉप ट्रेडिंग फायदेशीर तेव्हाच वाटतं, जोपर्यंत सगळं सुरळीत चालतं. पण जसेच नुकसान होते, हे संपूर्ण सिस्टीम तुम्हाला एकटं टाकून निघून जाते. कोणताही पुरावा नसतो, आणि तुमचा पैसा कायमचा अंधारात हरवतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2025 3:42 PM IST
मराठी बातम्या/मनी/
शेअर बाजारात 150 कोटींचा घोटाळा; कुठलाही पुरावा नाही, सगळा पैसा गायब, मुंबईसह अनेक शहरात भयानक Prop Trading जाळं


