FD पेक्षा जास्त रिटर्न देते ही सरकारी स्किम! 31 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. सध्या महिलांना कोणत्याही अल्पकालीन बचत योजनेवर इतके व्याज मिळत नाही. ही योजना 2 वर्षात परिपक्व होते.
MSSC Scheme: महिलांसाठी सुरू केलेली सेव्हिंग स्किम आता लवकरच बंद होणार आहे. 2023 मध्ये सुरू झालेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजनेअंतर्गत, 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करण्याची संधी आहे. 1 एप्रिलपासून या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही. 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या योजनेची घोषणा केली. तसंच, यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी या योजनेचा विस्तार करण्याची कोणतीही घोषणा केली नाही. म्हणून, ही योजना 31 मार्च रोजी बँका आणि पोस्ट ऑफिस बंद झाल्यावर बंद होईल.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत 7.5 टक्के व्याज दिले जात आहे. सध्या महिलांना कोणत्याही अल्पकालीन बचत योजनेवर इतके व्याज मिळत नाही. ही योजना 2 वर्षात परिपक्व होते आणि या योजनेत जास्तीत जास्त 2 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते. या योजनेत तुम्ही किमान 1000 रुपये देखील जमा करू शकता. ही योजना कोणत्याही बँकेत उघडता येते. याशिवाय, तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये MSSC खाते देखील उघडू शकता.
advertisement
तुम्हाला MSSC वर पूर्णपणे फिक्स आणि गॅरंटीड रिटर्न मिळेल
नावाप्रमाणेच, या योजनेअंतर्गत फक्त महिलाच अकाउंट उघडू शकतात. जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या पत्नी, आई, मुलगी किंवा बहिणीच्या नावाने या योजनेत अकाउंट देखील उघडू शकता. ही एक सरकारी योजना आहे. त्यामुळे त्यात गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. या योजनेवर तुम्हाला पूर्णपणे निश्चित आणि गॅरंटीड रिटर्न मिळेल. लक्षात ठेवा की, यामध्ये गुंतवणूक करण्याची मुदत फक्त 31 मार्च 2025 पर्यंत आहे आणि त्यानंतर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 10, 2025 1:53 PM IST