एक चांगली आयडिया अन् तरुणीचं नशीब बदललं, कॉलेज करूनही करते व्यवसाय, पैशांची अडचण दूर!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सध्याचा घडीला अनेक तरुण-तरुणी शिक्षण सुरु असताना व्यवसायाकडे वळत आहेत. अश्याच एका तरुणीची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई : सध्याचा घडीला अनेक तरुण-तरुणी शिक्षण सुरु असताना व्यवसायाकडे वळत आहेत. मुंबईतील अनेक कॉलेजचे तरुण-तरुणी हल्ली कॉलेज सांभाळून व्यवसाय करत आहेत. अश्याच एका तरुणीची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या तरुणीचे नाव पूर्वा वायकर आहे. तिने होम मेड केक बनवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.
घाटकोपरमधील पूर्वा वायकर होम मेड केक बनवते. तिचे सध्या शिक्षण सुरु आहे. तिने युव्हर्स क्रेव्हिंग्स नावाने स्वतःचा व्यवसाय चालू केला असून ती फक्त 19 वर्षांची आहे. पूर्वाच्या केकला मोठ्या प्रमाणात मुंबईतील अनेक जणांकडून मागणी आहे. आपण बाजारातून आणलेला केक फ्रेश असेलच अशी काही खात्री नसते अशा वेळी होम मेड केकची मागणी केली जाते. पूर्वाकडे मिळणारे केक हे बाजार भावापेक्षा स्वस्त आणि फ्रेश असतात.
advertisement
केक मधील व्हरायटी - ब्लॅक फॉरेस्ट, व्हाइट फॉरेस्ट, डच चॉकलेट, ओरिओ, किटकॅट, चॉकलेट ट्रफल, पाइनऍपल, मिक्स फ्रुट, टेंडर कोकोनट, बटरस्कॉच, गुलकंद, रेड वेलवेट, रसमलाई, गुलाबजामुन या सगळ्या व्हरायटीमध्ये केक उपलब्ध आहेत. या केकची किंमत फक्त 180 रुपयांपासून सुरू होते आहे.
advertisement
तुम्हाला जर तुमचा केक कस्टमाइज करून हवा असेल तर तो सुद्धा मिळेल. त्याचसोबत तुम्हाला चविष्ट बेक चीज केक आणि स्विझ रोल मध्ये सुद्धा ब्लॅक फॉरेस्ट स्वीज रोल, चॉकलेट स्विज रोल, स्ट्रॉबेरी स्वीज रोल उपलब्ध आहे. ब्राउनी, कप केक, कुकीझ आणि तर्कीश ड्रेझर्ट सुद्धा उपलब्ध आहेत.
'मी लॉकडाऊनमध्ये व्यवसायाला सुरुवात केली. यामध्ये व्यवसाय करायचा असं काही ठरवलं नव्हतं. लॉकडाऊनमध्ये सगळेच दुकान बंद असल्याने नवीन काहीतरी म्हणून मी स्वतः घरी केक बनवले आणि सगळ्यांना ते आवडले सुद्धा. इथूनच केकचा व्यवसाय सुरु करण्याची आयडिया सुचली आणि माझा प्रवास सुरू झाला. आता मी केक सोबतच स्विझरोल, डेझर्ट, कप केक आणि ब्राउनी सुद्धा बनवते. यामधून मला महिन्याला 20 हजारांपेक्षा जास्त नफा होतो' असे पूर्वा हिने सांगितले.
advertisement
खरंच पूर्वा तरुणांसाठी एक आदर्शच आहे. अभ्यास सांभाळून ती तिचा व्यवसाय सुद्धा सांभाळते. हे प्रत्येकाला जमतं असं नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा फ्रेश केक हवा असेल तर आवर्जून पूर्वा सोबत वरदविनायक मंडळ, जगदुशा नगर, घाटकोपर इथे संपर्क साधा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 28, 2024 3:51 PM IST
मराठी बातम्या/मनी/
एक चांगली आयडिया अन् तरुणीचं नशीब बदललं, कॉलेज करूनही करते व्यवसाय, पैशांची अडचण दूर!