Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, बदलेले नियम समजून घ्या नाहीतर बसेल मोठा फटका
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
म्युच्युअल फंड आणि डिमॅट खातेधारकांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. १ मार्चपासून एक मोठा नियम बदलत आहे.
मुंबई: तुम्ही म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. म्युच्युअल फंडचे नियम दोन दिवसात बदलणार आहेत. तुम्ही जर ते समजून घेतले नाहीत तर तुमचं आर्थिक मोठं नुकसान होऊ शकतं. ते टाळण्यासाठी हे नियम काय आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊया. दोन दिवसांनंतर म्हणजे 1 मार्च 2025 पासून, म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांचा एक मोठा नियम बदलणार आहे.
नवीन नियमांची माहिती सेबीने दिली. जर तुमचेही डिमॅट खाते असेल किंवा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सेबीने म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्याशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला. त्यांचा उद्देश हक्क नसलेल्या मालमत्तेचे प्रमाण कमी करणे आणि गुंतवणुकीचे चांगले व्यवस्थापन करणे आहे.
आधी काय होता नियम?
गुंतवणूकदाराच्या आजारपणात किंवा मृत्यूनंतर त्या पैशांचं व्यवस्थापन नीट करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सेबीने यापूर्वी माहिती दिली होती की, गुंतवणूकदार आता डिमॅट खाते किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींना नॉमिनी ठेवू शकतो. गुंतवणूकदाराला नॉमिनी घोषित करावे लागेल. गुंतवणूकदाराच्या पॉवर ऑफ अॅटर्नी (PoA) धारकांच्या वतीने हे करता येत नाही. नॉमिनी व्यक्ती इतर नॉमिनीसोबत जॉईन्ट म्हणून पुढे चालू ठेवू शकतात. शिवाय नॉमिनी अकाउंटहोल्डर हा आपलं स्वतंत्र डिमॅट खातं उघडू शकतो.
advertisement
नॉमिनी व्यक्तीची माहिती कशी अपडेट करू शकतो?
नामांकन अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे सादर करता येईल. ऑनलाइन अर्जांसाठी, संस्था डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रे किंवा आधार-आधारित इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीद्वारे नॉमिनेशन मान्य होईल. याशिवाय, गुंतवणूकदारांना प्रत्येक नॉमिनीला सबमिशनसाठी एक पावती मिळेल, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित होईल. नियमन केलेल्या संस्थांनी खाते किंवा फोलिओ हस्तांतरित केल्यानंतर 8 वर्षांपर्यंत नामनिर्देशित व्यक्तीचे आणि पावतीचे रेकॉर्ड ठेवावेत.
advertisement
गुंतवणूकदारांना हे तपशील द्यावे लागतील
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, गुंतवणूकदारांना आता त्यांच्या नामांकित व्यक्तींबद्दल अधिक माहिती द्यावी लागेल. यामध्ये नामनिर्देशित व्यक्तीचा पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक किंवा त्यांच्या आधार क्रमांकाचे शेवटचे चार अंक यासारखे आवश्यक ओळख तपशील समाविष्ट आहेत. याशिवाय, गुंतवणूकदारांना नामांकित व्यक्तीचे संपर्क तपशील आणि त्यांच्याशी असलेले त्याचे/तिचे नातेसंबंध द्यावे लागतील.
advertisement
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. इक्विटी म्युच्युअल फंडांचे मागील परतावे भविष्यात अशाच कामगिरीची हमी मानले जाऊ शकत नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 2:59 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, बदलेले नियम समजून घ्या नाहीतर बसेल मोठा फटका