रतन टाटांची इच्छा पूर्ण झाली, नोएल टाटा नव्हे या जवळच्या व्यक्तीची केली महत्त्वाच्यापदावर नियुक्ती

Last Updated:

Ratan Tata Endowment Foundation: रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनच्या चेअरमनपदी टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटांच्या इच्छेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई: टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांची रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन (RTEF)चे चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. RTEF ही सेक्शन 8 कंपनी आहे. ही कंपनी रतन टाटांनी स्थापन केली होती. त्यांनी आपली बहुतांश संपत्ती दान व परोपकारी कार्यासाठी या फाउंडेशनला हस्तांतरित केले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, रतन टाटांच्या इच्छेनुसार त्यांचे इच्छापत्र कार्यान्वित करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बाह्य कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर चंद्रशेखरन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. टाटा ट्रस्टच्या नियमांनुसार, टाटा सन्सच्या चेअरमनला टाटा ट्रस्टच्या चेअरमनपदावर बसता येत नाही, मात्र RTEF फाउंडेशन टाटा ट्रस्टशी संबंधित नसल्याने हा नियम येथे लागू होत नाही. टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन नोएल टाटा या फाउंडेशनचा भाग असणार नाहीत.
advertisement
मंदीत संधी देणारी यादी! आता गुंतवणुकदारांचे पैसै बुडणार नाहीत तर दुप्पट होणार
रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार एग्जिक्युटर्स डेरियस खंबाटा, मेहली मिस्त्री आणि शिरीन व डिएना जेजीभॉय यांनी फाउंडेशनच्या नेतृत्वासाठी चंद्रशेखरन यांची निवड केली. आता चंद्रशेखरन लवकरच या फाउंडेशनच्या व्यवस्थापनाची औपचारिक रचना ठरवतील आणि कार्यसंघाची निवड पूर्ण करतील. रतन टाटांच्या संपत्तीचे वितरण मार्च महिन्याच्या अखेरीस प्रोबेटसाठी सादर केल्यानंतर आणि बॉम्बे हायकोर्टाकडून प्रमाणित झाल्यानंतरच करता येईल. या प्रक्रियेला सहा महिने लागू शकतात.
advertisement
टाटा सन्स आणि समूहातील कंपन्यांमध्ये रतन टाटांची असलेली हिस्सेदारी तसेच टाटा टेक्नोलॉजीज आणि टाटा डिजिटलमधील गुंतवणुकीतून मिळणारे भांडवल फाउंडेशनला प्राप्त होईल.
इतकी पगारवाढ? विश्वास बसणार नाही! कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी थेट 51,480 + पेन्शन
रतन टाटांनी RTEF साठी आर. आर. शास्त्री आणि बुर्जिस तारापोरवाला यांना होल्डिंग ट्रस्टी तर जमशेद पोंचा यांना सीईओ म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी या फाउंडेशनला टाटा ट्रस्ट्सपासून स्वतंत्र ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र ट्रस्टींच्या नियुक्तीसाठी कोणतेही स्पष्ट लिखित निर्देश दिले नव्हते.
advertisement
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ८६ वर्षांचे असताना रतन टाटांचे निधन झाले. त्यांच्या मालकीच्या टाटा सन्समधील थेट हिस्सेदारी 0.83% होती. त्यांच्या एकूण संपत्ती 8 हजार कोटींपेक्षा अधिक असण्याचा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष संपत्ती यापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. याशिवाय त्यांच्या ताब्यात फेरारी आणि मसेरातीसारख्या आलिशान गाड्या, महागड्या चित्रकला, स्टार्टअप्समधील शेअर्स आणि इतर गुंतवणुकी होत्या. त्यांच्या वैयक्तिक गुंतवणूक कंपनी RNT असोसिएट्सकडे 2023 पर्यंत 186 कोटींची गुंतवणूक होती, ज्याची किंमत आता अनेक पटींनी वाढली आहे.
मराठी बातम्या/मनी/
रतन टाटांची इच्छा पूर्ण झाली, नोएल टाटा नव्हे या जवळच्या व्यक्तीची केली महत्त्वाच्यापदावर नियुक्ती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement