Share Market Prediction: मंदीत संधी देणारी यादी! आता गुंतवणुकदारांचे पैसै बुडणार नाहीत तर दुप्पट होणार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: सेन्सेक्स आणि निफ्टीत होणाऱ्या घसरणीमुळे शेअर बाजारात अनेकांचे नुकसान होत आहे. पण या घसरणीतच एक मोठी संधी दडली आहे.
नवी दिल्ली: भारतीय शेअर बाजारात या वर्षाच्या सुरुवातीपासून सातत्याने घसरण होत आहे. या घसरणीमुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. कोटींची गुंतवणूक गडगडली अनेक गुंतवणूकदार बाजारातून बाहेर पडले. बाजार अस्थीर असताना मात्र आता गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ सुशील केडिया यांनी असा दावा केला आहे की, बाजार मोठी तेजी येणार असून आगामी काळात 80% पर्यंत परतावा मिळू शकतो.
कोणते शेअर्स करणार मालामाल
सुशील केडिया यांच्या मते, बाजारात जरी अस्थिरता राहिली असली, तरी लवकरच तेजी दिसून येईल. बँकिंग आणि आयटी सेक्टरमुळे बाजाराला मोठा आधार मिळेल आणि त्यामुळे गुंतवणूकदारांमधील भीतीही दूर होईल. सध्या निफ्टी 22,897 च्या पातळीवर आहे, मात्र तो 23,150 च्या वर गेला, तर 25,000 पर्यंत मजल मारण्याची शक्यता आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना थोड्या प्रमाणात खरेदी सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि निफ्टी 23,150 च्या वर गेल्यावर मोठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
बँकिंग शेअर्समधून मोठ्या परताव्याची शक्यता
बँक निफ्टीमध्ये मोठ्या बँकांमध्ये तेजीचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. एसबीआय (SBI) सर्वाधिक परतावा देण्याची शक्यता आहे. तसेच, आरबीएल बँक, बंधन बँक, डीसीबी आणि एयू स्मॉल फायनान्स बँक यासारखे छोटे खासगी बँकिंग शेअर्स 70-80% पर्यंत परतावा देऊ शकतात.
advertisement
रिअल इस्टेट सेक्टरमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी
बँकिंग क्षेत्रासोबतच रिअल इस्टेट सेक्टरही मोठा परतावा देऊ शकतात. डीएलएफ (DLF) 65% पर्यंत तर गोदरेज प्रॉपर्टीज 75% पर्यंत परतावा देऊ शकतो. शोभा डेव्हलपर्ससारखे स्टॉक्स 2 ते 2.5 पट वाढू शकतात. तसेच, LIC हाउसिंग सारखे हाउसिंग फायनान्स स्टॉक्स गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करू शकतात.
इन्शुरन्स, ऑटो आणि हेल्थकेअर क्षेत्रातही मोठ्या वाढीचा अंदाज
इन्शुरन्स क्षेत्रातील एलआयसी (LIC) मध्ये 50% वाढ होण्याची शक्यता आहे, तर एचडीएफसी लाइफ आणि एसबीआय लाइफ मध्ये 60-70% वाढ अपेक्षित आहे. एंजेल ब्रोकिंग आणि मोतीलाल ओसवाल यासारखे शेअर्सही 70% पर्यंत वाढू शकतात. ऑटो सेक्टरमध्येही मोठ्या वाढीचा अंदाज असून टीव्हीएस मोटर, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प आणि टाटा मोटर्स यासारख्या कंपन्यांचे शेअर्स नव्या उच्चांकाकडे वाटचाल करत आहेत. हेल्थकेअर क्षेत्रातही मोठी संधी आहे. अपोलो हॉस्पिटल, डॉ. लाल पाथलॅब आणि मेट्रोपोलिस यांसारख्या स्टॉक्समध्ये 40% पर्यंत वाढ होऊ शकते.
advertisement
शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी
शेअर बाजारात लवकरच मोठी तेजी येण्याची शक्यता आहे आणि 2025च्या अखेरीस गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळू शकतो. बाजारात गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ असू शकते, मात्र गुंतवणूक करताना योग्य अभ्यास करून आणि धोरण आखून पुढे जाण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 25, 2025 8:14 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market Prediction: मंदीत संधी देणारी यादी! आता गुंतवणुकदारांचे पैसै बुडणार नाहीत तर दुप्पट होणार