Multibagger Stock: शेअर बाजार कोसळतोय पण हे गुंतवणुकदार झाले करोडपती,1 लाखाचे झाले 2 कोटी!

Last Updated:

Multibagger Stock: जर एखाद्याने या कंपनीत १६ वर्षापूर्वी १ लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज २ कोटी झाले असते. जाणून घ्या कंपनीच्या शेअर्सची आजची किंमत.

News18
News18
मुंबई: शेअर बाजारात असे काही स्टॉक्स असतात जे गुंतवणूकदारांचे नशीब बदलू शकतात. अशाच एका स्टॉकने अवघ्या 16 वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. टीपीसीएल पॅकेजिंग (TCPL Packaging) या कंपनीच्या शेअर्सने 19,471% परतावा दिला असून, ज्यांनी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांचे गुंतवणूक केली असेल ती आज जवळपास 1.97 कोटींवर पोहोचले आहे.
टीपीसीएल स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ
मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी टीपीसीएलच्या शेअरच्या किमतीत तब्बल 7.74% वाढ झाली आणि तो 4,150.50 रुपयांवर पोहोचला. अवघ्या एका दिवसातच याच्या किमतीत 298 रुपयांची वाढ झाली आहे. टीपीसीएल ही कंपनी 1987 पासून पॅकेजिंग मटेरियल बनवण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे.
advertisement
1 लाख रुपयांचे झाले 1.97 कोटी
टीपीसीएलने गेल्या 16 वर्षांत 19,471% परतावा दिला आहे. याचा अर्थ जर एखाद्या गुंतवणूकदाराने 16 वर्षांपूर्वी फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य जवळपास 2 कोटींवर पोहोचले असते.
गेल्या एका वर्षातील दमदार परफॉर्मन्स
टीपीसीएलच्या स्टॉकमध्ये गेल्या 1 वर्षात 86% वाढ झाली आहे. तर फक्त 6 महिन्यांत 27% परतावा दिला आहे. मागील एका वर्षात स्टॉक 3,222.85 रुपयांवरून 4,150 रुपयांपर्यंत वाढला आहे. कंपनीचा आर्थिक ताळेबंदही मजबूत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 18.8 कोटींवरून 37.7 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या एकूण कमाईत 32% वाढ झाली असून, ही कमाई 363.6 कोटींवरून 479.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. EBITDA देखील 29% वाढून 70.60 कोटींवर पोहोचला आहे.
advertisement
टीपीसीएल स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर
टीपीसीएल पॅकेजिंग स्टॉकने दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या व्यवसायाचा विस्तार, मजबूत आर्थिक स्थिती आणि सातत्यपूर्ण वाढ पाहता, या स्टॉकमध्ये भविष्यातही चांगली गुंतवणुकीची संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Multibagger Stock: शेअर बाजार कोसळतोय पण हे गुंतवणुकदार झाले करोडपती,1 लाखाचे झाले 2 कोटी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement