होळीची आधी होणार मोठी घोषणा; वेतन आयोग, आयकर सवलतीनंतर आता मिळणार अजून एक जॅकपॉट

Last Updated:

DA Hike 2025: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असून लवकरच महागाई भत्ता (DA) 3% ते 4% वाढवण्याची शक्यता आहे.

News18
News18
नवी दिल्ली: केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. तर अलीकडेच सादर झालेल्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. आतालआता केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता (DA) वाढवण्यात येणार असल्याची अशी चर्चा आहे. सरकार होळीच्या आसपास म्हणजेच 14 मार्च 2025 च्या सुमारास यासंदर्भात मोठी घोषणा करू शकते.
DA मध्ये 3% ते 4% वाढीची शक्यता
केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई दिलासा (DR) वाढवते. यंदा DA मध्ये 3% ते 4% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत वेतनाच्या 53% इतका DA मिळतो.
advertisement
DA वाढीमुळे पगार आणि निवृत्ती वेतनावर परिणाम
जर DA चार टक्क्यांनी वाढला, तर कर्मचाऱ्यांचा महिन्याचा पगार कितीने वाढेल. एका कर्मचाऱ्याचे मूलभूत वेतन 36,500 रुपये असल्यास, सध्या त्याचा DA हा 19,345 रुपये आहे. DA मध्ये 4% वाढ झाल्यास, तो 20 हजार ८०५ रुपये होईल. तसेच जानेवारीपासूनची थकबाकी देखील मिळेल.
निवृत्ती वेतनधारकाचे पेन्शन 9 हजार रुपये असल्यास त्याला सध्या DR 4 हजार 770 रुपये मिळतो. DR मध्ये 4% वाढ झाल्यास, तो 5 हजार 130 रुपये होईल.
advertisement
DA दर कशावर ठरतो?
महागाई भत्त्याचा दर ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स (AICPI) वर आधारित असतो. सरकार या इंडेक्सच्या मागील 12 महिन्यांच्या सरासरी आकडेवारीनुसार DA आणि DR च्या दरात वाढ करत असते. सध्या 48.67 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 67.95 लाख पेन्शनधारक DA आणि DR च्या वाढीची वाट पाहत आहेत.
advertisement
कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या दृष्टीने होळीपूर्वी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. आता सरकार यासंबंधी अधिकृत घोषणा कधी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
होळीची आधी होणार मोठी घोषणा; वेतन आयोग, आयकर सवलतीनंतर आता मिळणार अजून एक जॅकपॉट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement