Mutual Fund: पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून बदलणार नियम

Last Updated:

गुंतवणूकदाराला नॉमिनी घोषित करावा लागेल. ही बाब गुंतवणूकदाराच्या पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर्सकडून केली जाऊ शकत नाही.

म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड
मुंबई: सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी या नियामक संस्थेने म्युच्युअल फंड्स आणि डीमॅट अकाउंट्सच्या नॉमिनीशी संबंधित असलेल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. क्लेम करण्यात न आलेल्या असेट्सची संख्या कमी करणं आणि गुंतवणुकीच्या उत्तम व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणं हा त्यामागचा उद्देश आहे. गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास किंवा तो आजारी पडल्यास या गोष्टींचा उपयोग होणार आहे. सेबीने असं म्हटलं आहे, की गुंतवणूकदार आता डीमॅट अकाउंट्स किंवा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये जास्तीत जास्त 10 व्यक्तींनाही नॉमिनी म्हणून नेमू शकतो. हा नियम एक मार्च 2025पासून लागू होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊ या.
नियम काय आहे?
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, गुंतवणूकदाराला नॉमिनी घोषित करावा लागेल. ही बाब गुंतवणूकदाराच्या पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर्सकडून केली जाऊ शकत नाही. नॉमिनी एक तर अन्य नॉमिनीजसह जॉइंट अकाउंट होल्डर्स म्हणून राहू शकतात किंवा आपल्याशी संबंधित हिश्श्यासाठी वेगवेगळी सिंगल अकाउंट्स किंवा फोलिओ उघडू शकतात.
नॉमिनीला असेट्स ट्रान्स्फर करण्यासाठी कोणती डॉक्युमेंट्स लागतील?
- मृत्यू झालेल्या गुंतवणूकदाराच्या डेथ सर्टिफिकेटची सेल्फ-अटेस्टेड कॉपी
advertisement
- नॉमिनीचं केवायसी पूर्ण असणं, अपडेटेड असणं आणि त्याची पुन्हा खात्री केलेली असणं गरजेचं आहे.
- क्रेडिटर्सचा ड्यू डिस्चार्ज
गुंतवणूकदारांना द्यावे लागतील हे तपशील
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गुंतवणूदारांना आता आपल्या नॉमिनीविषयी अधिक माहिती द्यावी लागेल. त्यात ओळख पटवणाऱ्या तपशीलांचा समावेश आहे. उदा. नॉमिनीचा पॅन, ड्रायव्हिंग लायसेन्स नंबर किंवा त्याच्या आधार क्रमांकातले शेवटचे चार अंक. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांना नॉमिनीचे काँटॅक्ट डिटेल्स द्यावे लागतील आणि ते आपल्याशी कशा प्रकारे संबंधित आहेत, याचीही माहिती द्यावी लागेल.
advertisement
नॉमिनी अपडेट कसे करायचे?
नॉमिनेशन फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारांनी जमा करता येतो. ऑनलाइन सबमिशनसाठी संस्था डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट किंवा आधार आधारित इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर्सच्या माध्यमातून सादर केलेलं नॉमिनेशन स्वीकारतील. त्याशिवाय, गुंतवणूकदारांना प्रत्येक नॉमिनेशन सबमिशन केल्यानंतर एक रिसीट मिळेल. त्यामुळे पूर्ण प्रक्रियेतली पारदर्शकता दिसेल. रेग्युलेटेड संस्थांना अकाउंट किंवा फोलिओ ट्रान्स्फरनंतर आठ वर्षांपर्यंत नॉमिनी आणि रिसीटचं रेकॉर्ड ठेवणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या/मनी/
Mutual Fund: पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून बदलणार नियम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement