Mutual Funds: SIP चा हप्ता चुकला तर काय करावं? दंड आकारला जातो का?

Last Updated:

एसआयपीचा हप्ता भरणं शक्य नाही असं वाटण्याइतकी आर्थिक परिस्थिती बिघडली असली, तर एसआयपी बंद करण्याऐवजी पॉझ करू शकता.

News18
News18
मुंबई: एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे आता जवळपास प्रत्येकाला माहिती आहे. एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदाराला एक निश्चित रक्कम नियमित कालांतराने म्युच्युअल फंडाच्या एखाद्या स्कीममध्ये गुंतवण्याची सुविधा मिळते. मासिक अगदी 500 रुपयांपासूनही यात गुंतवणूक सुरू करता येते. दीर्घकालीन विचार करता यातून इतका प्रॉफिट मिळतो, की कोणत्या सर्वसाधारण स्कीममधूनही मिळत नाही. एसआयपी सुरू केल्यानंतरदर महिन्याच्या ठरावीक तारखेला अकाउंटमधून पैसे कापले जात राहतात. कधी कधी एसआयपीचा हप्ता भरायचा राहून जातो. तसं झालं तर काय होतं, याची माहिती घेऊ या.
एसआयपीचे सलग तीन हप्ते चुकले, तर दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक एसआयपी आपोआप रद्द होऊ शकते. त्रैमासिक, द्वैमासिक किंवा दीर्घकालीन एसआयपी दोन हप्ते चुकल्यावर रद्द होते.
एसआयपीचा हप्ता चुकला, तर दंड भरावा लागत नाही; मात्र एसआयपीच्या हप्त्याइतके पैसे खात्यात नसले, तर बँकेकडून पेनल्टी लागू शकते. खात्यात पुरेसे पैसे नसल्याबद्दल बँका 150 ते 750 रुपयांपर्यंत पेनल्टी आकारू शकतात. प्रत्येक बँकेनुसार ही पेनल्टी वेगळी असू शकते.
advertisement
एसआयपीचा हप्ता चुकला, तर आर्थिक उद्दिष्टांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाजाराच्या हालचालींनुसार रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंगची संधी गमावली जाते. चुकलेल्या प्रत्येक हप्त्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम कमी होत जाते. त्यामुळे काळानुसार चक्रवाढ व्याजाने संपत्ती वाढण्यावर परिणाम होतो. त्यामुळे आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी भविष्यात अधिक गुंतवणूक करावी लागू शकते.
एसआयपीचा हप्ता भरणं शक्य नाही असं वाटण्याइतकी आर्थिक परिस्थिती बिघडली असली, तर एसआयपी बंद करण्याऐवजी पॉझ करू शकता. काही काळ पॉझ केल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्यावर एसआयपी पुन्हा सुरू करता येऊ शकते.
advertisement
आणखी एक उपाय म्हणजे एसआयपीचे हप्ते वेळेवर भरता यावेत म्हणून एसआयपीची रक्कम छोटी ठेवावी. मोठी रक्कम रेग्युलर मेन्टेन करणं काही वेळा कठीण होऊ शकतं. छोट्या रकमेची एसआयपी सुरळीतपणे चालवणं सोपं असतं. छोट्या रकमेच्या अनेक एसआयपी एका वेळीही चालवता येऊ शकतात.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पगार आल्यानंतर महिन्याच्या सुरुवातीलाच आवश्यक खर्चांची तरतूद करावी. एसआयपीच्या हप्त्याची तारीखही पगार जमा होण्याच्या तारखेनंतर लगेचची ठेवावी. त्यामुळे हप्ता लगेचच निघून जाईल आणि उर्वरित पैशांत बाकीचे खर्च मॅनेज करता येतील
view comments
मराठी बातम्या/मनी/
Mutual Funds: SIP चा हप्ता चुकला तर काय करावं? दंड आकारला जातो का?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement