Nita Ambani: नीता अंबानी यांनी हार्वर्ड विद्यापीठात दिलं भाषण, आईबद्दल बोलताना झाल्या भावुक
- Published by:sachin Salve
Last Updated:
रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी प्रतिष्ठित हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये मुख्य भाषण दिलं.
अमेरिका: रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी हार्वर्ड विद्यापीठाच्या भेटीबद्दलचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला. प्रतिष्ठित हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये नीता अंबानी यांनी मुख्य भाषण दिलं. बोस्टनमधील एका परिषदेत बोलताना, नीता अंबानी या भावुक झाल्या होत्या. "माझी ९० वर्षांची आई आज सकाळी खूप भावनिक झाली. त्यांनी श्लोका आणि राधिकाला फोन केला आणि म्हणाला, नीता लहान असताना तिला खरोखर हार्वर्डला जायचं होतं, पण आम्हाला ते परवडत नव्हतं आणि आज हार्वर्डने तिला भाषण देण्यासाठी आमंत्रित केलं आहे."
advertisement
१५ आणि १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये नीता यांनी मुख्य भाषण दिलं. याबद्दलचा एक व्हिडिओ रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आला आहे. एका प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी क्षणाबद्दल नीता अंबानी म्हणाल्या की, 'त्यांच्या आईने आज त्याच हार्वर्ड इथं त्यांच्या व्यासपीठावर मुख्य भाषण देण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांना अभिमान वाटला जिथं आर्थिक अडचणींमुळे त्या मला शिक्षणासाठी पाठवू शकल्या नाहीत." या पोस्टमध्ये नीता प्रेक्षकांशी बोलतानाचा ५० सेकंदांचा व्हिडिओ देखील समाविष्ट आहे.
advertisement
“सुरुवात करण्यापूर्वी, मला एक गोष्ट सांगायची आहे. आज सकाळी, माझी ९० वर्षांची आई खूप भावुक झाली. त्यांनी माझ्या दोन्ही भाच्यांना, श्लोका आणि राधिकाला बोलावलं आणि म्हणाले, ‘नीता लहान असताना, आम्ही तिला हार्वर्डला पाठवू शकत नव्हतो, पण तिला पाठवायचे होतं. पण आता, आज, त्यांनी तिला हार्वर्डमध्ये बोलण्यासाठी आमंत्रित केले आहे. आज माझ्या आईला इतके आनंदी केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद," असं म्हणत नीता अंबानी यांनी सगळ्यांचे आभार मानले.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 17, 2025 11:12 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Nita Ambani: नीता अंबानी यांनी हार्वर्ड विद्यापीठात दिलं भाषण, आईबद्दल बोलताना झाल्या भावुक