Success story : इंग्लंडमधील नोकरी सोडली, तरुणानं सुरू केला मसाला व्यवसाय, महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल

Last Updated:

नोकरी सोडून नितेशने नाशिकमध्ये आशापुरी मसाले हा स्वतःचा ब्रँड सुरू केला असून, आज त्यातून तो लाखो रुपयांची उलाढाल करत आहे.

+
सातासमुद्रापारचे शिक्षण, पण ओढ मातीची! नितेश शिरोडे यांची 'मसालेदार' यशोगाथा.

"सातासमुद्रापारचे शिक्षण, पण ओढ मातीची! नितेश शिरोडे यांची 'मसालेदार' यशोगाथा."

नाशिक: शिका आणि मोठे व्हा असा सल्ला सर्वच देतात, पण शिकून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे धाडस मोजकेच दाखवतात. नाशिकच्या नितेश शिरोडे या तरुणाने हेच धाडस दाखवून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. इंग्लंडमध्ये फार्मसीचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर, तिथली सुखासीन नोकरी सोडून नितेशने नाशिकमध्ये आशापुरी मसाले हा स्वतःचा ब्रँड सुरू केला असून, आज त्यातून तो महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल करत आहे.
शिक्षणाची ओढ आणि परदेशातील प्रवास
नितेशला बालपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती. नाशिकमधून फार्मसीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अधिक प्रगतीसाठी त्याने इंग्लंड गाठले. तिथल्या नामांकित महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेत असताना, परदेशातील खर्च भागवण्यासाठी त्याने एका हॉटेलमध्ये नोकरीही केली. हीच नोकरी त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.
advertisement
स्वदेशी परतण्याचा निर्णय
हॉटेलमध्ये काम करत असताना नितेशच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे विचार घोळू लागले. परदेशात नोकरी करून पैसा कमावण्यापेक्षा आपल्या मायभूमीत जाऊन काहीतरी वेगळे करावे, या जिद्दीने त्याने भारत गाठले. त्याच्या या निर्णयाला कुटुंबीयांनीही खंबीर साथ दिली.
कोरोनानंतरच्या संधीचे सोने
व्यवसाय नक्की कोणता करायचा, असा प्रश्न नितेशसमोर होता. कोरोना काळानंतर हॉटेल क्षेत्राची झालेली व्याप्ती त्याने ओळखली. हॉटेल व्यवसायापेक्षा, हॉटेलसाठी लागणाऱ्या दर्जेदार मसाल्यांची मागणी मोठी असल्याचे त्याच्या लक्षात आले. इंग्लंडमधील कामाचा अनुभव आणि भारतीय मसाल्यांची चव यांचा मेळ घालत त्याने आशापुरी मसाले नावाने मसाला मार्ट सुरू केले.
advertisement
जिद्द आणि यश
लोक काय म्हणतील? याचा विचार न करता नितेशने या व्यवसायात झोकून दिले. आज उच्चशिक्षित असूनही तो स्वतःचा व्यवसाय हिमतीने सांभाळत आहे. आपल्या दर्जेदार मसाल्यांच्या जोरावर त्याने बाजारपेठेत जम बसवला असून, दरमहा 1 लाख रुपयांची उलाढाल तो करत आहे. उच्च शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून, ते आपल्याला स्वावलंबी बनवण्यासाठी असते, हेच नितेशने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success story : इंग्लंडमधील नोकरी सोडली, तरुणानं सुरू केला मसाला व्यवसाय, महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement