ITR Return: इनकम टॅक्स भरला नाही तर किती दंड बसेल, होऊ शकते का जेल? जाणून घ्या नियम

Last Updated:

ITR Return: अजूनही ITR भरणं जे टाळतात किंवा दुर्लक्ष करतात त्यांची आता खैर नाही. त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.

News18
News18
तुमचं उत्पन्न किती, 2 लाख 3 लाख पाच लाख की 10 लाख कितीही असो पण तुम्ही कर भरता का? उत्पन्न जास्त असो किंवा कमी आयटीआर फाइल करणं आवश्यक आहे. तुम्ही करत नसाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कर चुकवणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. अजूनही ITR भरणं जे टाळतात किंवा दुर्लक्ष करतात त्यांची आता खैर नाही. त्यांना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
तुम्ही कर भरला की नाही?
जर तुम्ही आयकर स्लॅबमध्ये येत असाल, तर ITR भरणं ही केवळ नैतिक जबाबदारी नाही, तर कायदेशीर बंधनही आहे. कर न भरल्यास तो गुन्हा समजला जातो आणि यासाठी दंड, नोटीस, तपास आणि काही वेळा तुरुंगवासासारख्या कठोर शिक्षा होऊ शकतात. तुम्ही आयकर स्लॅबमध्ये येत नसाल तरीही तुम्ही आयटीआर फाइल करणं आवश्यक आहे. शून्य करावरही आयटीआर फाइल करता येतो.
advertisement
किती दंड भरावा लागतो?
जर तुम्ही ITR उशिरा भरला, तर आयकर विभागाच्या कलम 234F नुसार दंड आकारला जातो. समजा तुमचं पॅकेज 5 लाख आहे तर तुम्हाला नियमानुसार 1 टक्के कर आकारला जातो. म्हणजे 5000 रुपये दंड तुम्हाला भरावा लागेल. जर 10 लाखांचं पॅकेज असेल तर 10 हजार दंड भरावा लागेल. पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 1,000 रुपये दंड आकारला जातो. ITR वेळेवर न भरल्यास, किंवा जर कर थकवला असेल तर आयकर विभागाच्या कलम 156 नुसार तुमच्या घरी थेट नोटीस येऊ शकते. यात थकीत कर, व्याज आणि दंडाची मागणी केली जाते. नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास पुढे मोठी कायदेशीर कारवाई होऊ शकते.
advertisement
कर थकवल्यास आयकर विभाग कोणती कारवाई करतं?
जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाची चुकीची माहिती दिली, तर कलम 270A नुसार तुम्हाला कराच्या 50% ते 200% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. जर तुम्ही मुद्दामहून कर भरला नाही, तर कलम 276CC नुसार 3 महिने ते 7 वर्षांपर्यंतची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आयकर भरला नाही आणि चुकीची माहिती दिली तर तुमचं बँक खातं सील केलं जाऊ शकतं. तुमच्या पगारातून थेट वसुली केली जाऊ शकते. गरज भासल्यास तुमची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकारही आयकर विभागाला आहे. गंभीर प्रकरणात पासपोर्टसुद्धा रद्द केला जाऊ शकतो.
advertisement
ITR भरण्यासाठी मुदतवाढ
आयकर भरण्यासाठी सरकारने यावेळी मुदतवाढ दिली आहे. 15 सप्टेंबरपर्यंत आयकर भरता येणार आहे. येत्या नव्या आर्थिक वर्षात टॅक्स स्लॅबची मर्यादा वाढवण्यात आली आहे. नव्या रिजीममध्ये 12 लाखांपर्यंत कोणताही कर लागणार नाही. तर जुन्या रिजीमनुसार आयकर भरला तर मात्र तुम्हाला कर लागू शकतो. इतकंच नाही तर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी तुम्हाला वेगळा कर भरावा लागणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
ITR Return: इनकम टॅक्स भरला नाही तर किती दंड बसेल, होऊ शकते का जेल? जाणून घ्या नियम
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement