'आता सगळं काही स्वस्त होणार, विकासासाठी हा डबल डोस' पंतप्रधान मोदींची GST 2.0 वर प्रतिक्रिया
- Published by:Sachin S
Last Updated:
"जीएसटीबाबत आम्ही दिलेले वचन आम्ही पूर्ण केले आहे. हे सुधारणांचा दुहेरी डोस आहे. जीएसटी कमी केल्याने लोकांची जीवनशैली सुधारेल"
मुंबई: महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अखेरीस जीएसटीच्या करप्रणालीमध्ये बदल केला आहे. ५ टक्के आणि १२ टक्के हा टॅक्स स्लॅब आता राहणार आहे. २८ टक्के स्लॅब आता रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी दर कपातीबाबत पहिल्यांदाच टीव्ही कॅमेऱ्यांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. "जीएसटीबाबत आम्ही दिलेले वचन आम्ही पूर्ण केले आहे. हे सुधारणांचा दुहेरी डोस आहे. जीएसटी कमी केल्याने लोकांची जीवनशैली सुधारेल" असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
"नवीन जीएसटी सुधारणांमुळे चीजपासून ते सुक्या मेव्यापर्यंत सर्व काही पूर्वीपेक्षा स्वस्त झालं आहे. जीएसटीबाबत आम्ही दिलेलं वचन आम्ही पूर्ण केलं आहे. हे सुधारणांचा दुहेरी डोस आहे. जीएसटी कमी केल्याने लोकांची जीवनशैली सुधारेल. जीएसटी कपात व्यवसाय सुलभतेत मदत करेल. याशिवाय, सुधारणा लोकांच्या हातात पैसे आणतील आणि वापर वाढवेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला फायदा होईल. पंतप्रधान म्हणाले की भारताचा विकास सुमारे आठ टक्के आहे. आपण जगातील सर्वात वेगाने वाढत आहोत. सुधारणांची प्रक्रिया भारताला स्वावलंबी बनवत राहील' अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली.
advertisement
काँग्रेसच्या राजवटीत शेतकरी नाराज
शिक्षक दिनाच्या एक दिवस आधी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की, शिक्षकांचे काम वर्गखोल्यांच्या पलीकडे जातं. ते चारित्र्यनिर्मिती आणि युवाशक्तीच्या कुतूहलाला प्रोत्साहन देतात. काँग्रेसच्या राजवटीत शेतकरी नाराज होते. काँग्रेस शेतकऱ्यांकडून कृषी उपकरणांवर मोठा कर घेत होते. आम्ही यावर शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. अशा सुधारणा सातत्याने होत राहिल्या पाहिजेत. स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा निर्णय आहे, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली.
advertisement
'मुलांनी परदेशी वस्तूंच्या वापराची यादी बनवावी'
"मुलांनी कुटुंबात बसून यादी बनवावी. सकाळपासून दुसऱ्या दिवसापर्यंत घरात वापरल्या जाणाऱ्या किती वस्तू परदेशी आहेत याची माहिती घेतली तर आपल्या देशाला यातून काय मिळेल हे आपल्याला समजेल. तुम्ही संपूर्ण नवीन पिढीला एकत्रित करू शकता. खाद्यतेल आयात करण्यासाठी एक लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. हे थांबवता येईल,असंही पंतप्रधान म्हणाले.
advertisement
व्होकल फॉर लोकलवर लक्ष
"आपल्याला मेड इन इंडियाचा प्रचार करण्याची गरज आहे. जर आपण भारतात बनवलेल्या उत्पादनांचा वापर केला तर भारत पुढे जाईल. यामुळे देश मजबूत होईल आणि आपल्याला असे परिणाम मिळतील ज्याचा देशाला फायदा होईल. भारत वेगाने पुढे जात आहे, व्होकल फॉर लोकलची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे' असंही ते यावेळी म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/मनी/
'आता सगळं काही स्वस्त होणार, विकासासाठी हा डबल डोस' पंतप्रधान मोदींची GST 2.0 वर प्रतिक्रिया