Loan घ्यायचंय? पाहा पर्सनल लोन घ्यावं की PPF लोन, कोणतं बेस्ट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पैशांची गरज पडल्यावर जास्तीत जास्त लोक हे पर्सनललोन घेतात. येथे व्याज 12% ते 18% पर्यंत असते. मात्र तुमच्याजवळ PPF अकाउंट असेल, तर तुम्ही त्यापेक्षा स्वस्त लोन घेऊ शकता. PPF वर सध्या 7.1% व्याज मिळतं आणि लोन घेतल्यावर फक्त 1% अतिरिक्त द्यावे लागतात. म्हणजेच एकूण व्याज जवळपास 8.1% येईल. जे पर्सनल लोनपेक्षा खुप कमी आहे. या लोनसाठी, CIBIL स्कोअर तपासला जात नाही आणि अनेक कागदपत्रांची देखील आवश्यकता नाही, कारण तुमचे स्वतःचे जमा केलेले पैसे त्याची हमी आहेत.
मुंबई : सध्याच्या काळात लोकांना पैशांची अडचण आली की, लोक पर्सनल लोन घेतात. येथे तब्बल 12 ते 18 टक्के व्याज द्यावे लागते. पण गरज असेल तर लोक एवढं व्याजही देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, तुमच्या अकाउंटमध्ये जमा पैहे हे एक प्रकारचे 'क्रेडिट कार्ड' बनू शकते? पीपीएफ लोन खुप स्वस्त पडते आणि ते फक्त 1 टक्के एक्स्ट्रा व्याजावर. पीपीएफवरही 7.1 टक्के व्याज मिळत आहे. तर लोनवर व्याज फक्त 8.1 टक्के लागेल.हे पर्सनल लोनपेक्षा खुप स्वस्त आहे. हे लोन कोणत्याही सीबिल स्कोअर चेक न करता, कोणतेही जास्त डॉक्यूमेंट्स न लावता मिळते. कारण येथे तुमचा स्वतःचा पैसा जमा आहे.
बँक ते देण्यास नकार देऊ शकत नाही; तो तुमचा कायदेशीर अधिकार आहे. पीपीएफ ही सर्वात सुरक्षित गुंतवणूकींपैकी एक आहे, जिथे गुंतवणूक, व्याज आणि परिपक्वता रक्कम सर्व करमुक्त आहे - ती E-E-E श्रेणीत येते. तसंच, एक सीक्रेट पीपीएफ लोन ऑप्शन आहे ज्याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही. हे कर्ज कोणत्याही वेळी उपलब्ध नसते, परंतु केवळ विशिष्ट कालावधीत उपलब्ध असते.
advertisement
पीपीएफ लोन
अकाउंट उघडल्याच्या पहिल्या वर्षापासून ते पाच वर्षांपर्यंतचा कालावधी असतो. उदाहरणार्थ, तुम्ही 2024 मध्ये पीपीएफ अकाउंट उघडले असेल, तर तुम्ही फक्त 2025 ते 2030 पर्यंत कर्ज घेऊ शकता. पाच वर्षांनंतर, कर्ज उपलब्ध नसते; त्यानंतर, फक्त अंशतः पैसे काढता येतात. कर्जाची रक्कम तुमच्या पीपीएफ बॅलेन्सवर अवलंबून असते आणि वर्षातून फक्त एकदाच घेता येते.
advertisement
लोन फेडण्याचा कालावधी जास्तीत जास्त 36 महिने आहे. पहिले मूळ राशी फेडावी लागते. हे तुम्ही ईएमआय किंवा एकदाच देऊ शकता. त्यानंतर व्याज दोन हप्त्यांत फेडावे लागते. तुम्ही 36 महिन्यात पूर्ण फेडले नाही तर व्याज 1 टक्क्यांनी वाढून 6 टक्के होते. तेही पेनल्टीसह. हे नियम कठोर आहेत, जेणेकरुन लोक पीपीएफ दीर्घकाळासाठी बचत म्हणून वापरु शकतील.
advertisement
या व्यतिरिक्त पीपीएफची खास गोष्ट म्हणजे 15 वर्षांनंतर अकाउंटला 5-5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवले जाऊ शकते. मॅच्योरिटीनंतरही बॅलेन्सवर व्याज मिळत राहतं. वर्षात एकदा पैसे काढणे टॅक्स-फ्री होऊ शकते. सातव्या वर्षी अंशतः पैसे काढणे सुरू होते.
advertisement
पर्सनल लोन
पर्सनल लोनशी तुलना केल्यास फरक स्पष्ट दिसतो. पर्सनल लोनवर व्याज 12 ते 18 टक्के लागते. प्रोसेसिंग फीस 1 ते 3 टक्के, CIBIL स्कोर आवश्यक असतो आणि उत्पन्न प्रमाणपत्र दाखवावे लागते. मात्र पीपीएफ लोनमध्ये कोणतीही फीस नाही, सिबिल स्कोअरची गरज नाही आणि व्याज फक्त 8.1 टक्के. गॅरंटी तुमचा स्वतःचा पैसा आहे. म्हणून रिस्क बँकेसाठी कमी आहे.मात्र पीपीएफ लोनची लिमिट आहे - ही फक्त 5 वर्षांच्या विंडोमध्ये मिळते आणि फेडण्याची सिमा ठरलेली आहे. तुम्ही दीर्घ काळासाठी पैसे जमा करत असाल तर हे खुप फायदेशीर आहे. कारण कठीण काळात तुम्हाला मदत मिळते.
advertisement
दरम्यान, तुम्ही पीपीएफमध्ये पैसे जमा केले तर ते केवळ बचतच देत नाही तर आपत्कालीन परिस्थितीत स्वस्त कर्जाचा ऑप्शन देखील देते. पर्सनल लोनच्या झटक्यात अडकण्यापेक्षा या पीपीएफ फायद्याचा फायदा घेणे चांगले. पण लक्षात ठेवा, कर्ज घेण्यापूर्वी सर्व नियम नीट समजून घ्या आणि त्यानंतरच त्याचे नियोजन करा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 5:52 PM IST









