दिवाळीत या 5 गोष्टी वाचल्याशिवाय पाऊल टाकू नका, नाहीतर पश्चात्ताप होईल; Personal Loan घेण्याआधी वाचा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Personal Loan For Diwali Shopping: दिवाळीचा खर्च भागवण्यासाठी पर्सनल लोन घेण्याचा विचार करताय? तर आधी थांबा आणि विचार करा, कारण कर्ज घेणं सोपं असलं तरी फेडणं कठीण असतं. फक्त आवश्यक खर्चासाठीच लोन घ्या, नाहीतर सणानंतर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता नक्की आहे.
मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे उत्साह, खरेदी आणि खर्चाचा काळ होय. नवीन कपडे, सजावट, भेटवस्तू आणि घरातील दुरुस्ती या सगळ्यासाठी अनेकांना मोठ्या प्रमाणात पैसे लागतात. जर तुमच्याकडे पुरेशी रक्कम नसेल, तर बँक किंवा एनबीएफसीकडून (Non-Banking Financial Company) पर्सनल लोन घेणे हा एक पर्याय असू शकतो. आजकाल केवळ एका क्लिकवर किंवा मोबाईल अॅपमधून तात्काळ लोन मंजूर होतं. त्यामुळे सणासुदीच्या काळात गरजेचे पैसे मिळवणे सोपे झाले आहे.
advertisement
मात्र तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की कर्ज घेण्याआधी विचारपूर्वक निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. कारण चुकीच्या निर्णयामुळे पुढे आर्थिक ओझे आणि पश्चात्ताप दोन्ही होऊ शकतात. जाणून घेऊया, पर्सनल लोन घेण्यापूर्वी लक्षात ठेवाव्या लागणाऱ्या 5 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी.
1. खर्च खरंच आवश्यक आहे का?
advertisement
सर्वप्रथम स्वतःला हा प्रश्न विचारा हा खर्च खरोखर गरजेचा आहे का? की फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे उदाहरणार्थ: घराची दुरुस्ती, वैद्यकीय खर्च किंवा मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेला खर्च आवश्यक असू शकतो. पण महागड्या भेटवस्तू, सजावटीसाठी जास्त खर्च, किंवा लक्झरी वस्तूंसाठी घेतलेले कर्ज नंतर त्रासदायक ठरू शकते. समजूतदार निर्णय म्हणजे फक्त आवश्यक गरजांसाठीच कर्ज घेणे.
advertisement
2. व्याजदर जास्त असतो, तुलना करा
पर्सनल लोन हे कोणत्याही गहाणाशिवाय (unsecured) दिले जाते. त्यामुळे यावरचा व्याजदर तुलनेने जास्त असतो.वेगवेगळ्या बँका आणि एनबीएफसींचे ब्याजदर वेगवेगळे असतात, म्हणून त्यांची तुलना करणे खूप महत्त्वाचे आहे.कधी-कधी त्यात प्रोसेसिंग फी, सर्व्हिस चार्ज किंवा इतर लपवलेले खर्च जोडले जातात. त्यामुळे कर्जाची एकूण किंमत समजून घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या.
advertisement
3. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर परिणाम होऊ नये
कर्ज घेताना हे पाहणं आवश्यक आहे की, त्याचा तुमच्या भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांवर परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ: जर तुम्ही पुढच्या दोन महिन्यांत नवीन कारचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर आत्ताच पर्सनल लोन घेणे योग्य ठरणार नाही. कारण एकाच वेळी अनेक कर्जांमुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो आणि पुढचं लोन मिळवणं कठीण होतं.
advertisement
4. थोडी बचत करूनही गरज भागवता येते
कर्ज घेण्याऐवजी, शक्य असल्यास काही महिन्यांची बचत करून दिवाळीच्या खर्चाची तयारी करणे ही उत्तम पद्धत आहे.यामुळे व्याजाचा भार टळतो आणि कर्जफेडीचा मानसिक ताणही कमी होतो. थोडी शिस्त आणि नियोजन असेल तर सणासुदीचा आनंद कर्जाशिवायही घेता येतो.
advertisement
5. कर्ज घ्यायचंच असेल, तर लहान घ्या
जर कर्ज घेणं अत्यावश्यकच असेल, तर छोटं आणि अल्प मुदतीचं कर्ज घ्या. जे तुम्ही 3 ते 6 महिन्यांत सहज फेडू शकता.यामुळे दिवाळीचा आनंदही टिकेल आणि आर्थिक ताणही वाढणार नाही. मोठं कर्ज घेतल्यास EMI चा बोजा पुढील काही महिन्यांसाठी तुमच्या घरखर्चावर परिणाम करू शकतो.
सणासुदीच्या काळात कर्ज घेणं वाईट नाही, पण कर्जाचं नियोजन शहाणपणाने करणे अत्यावश्यक आहे.तुमचं प्रत्येक आर्थिक पाऊल हे भावनांपेक्षा वास्तवाच्या आधारावर असायला हवं. दिवाळीत आनंदाचा दिवा पेटवताना, व्याजाच्या ओझ्याचा अंधार घरात येऊ नये, याची काळजी घ्या. कारण सण एक दिवसाचा असतो, पण कर्जाचा ताण अनेक महिन्यांसाठी येतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 11, 2025 7:26 AM IST
मराठी बातम्या/मनी/
दिवाळीत या 5 गोष्टी वाचल्याशिवाय पाऊल टाकू नका, नाहीतर पश्चात्ताप होईल; Personal Loan घेण्याआधी वाचा