PNB बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एटीएम संबंधित नियमात महत्वाचा बदल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पंजाब नॅशनल बँकेने आपल्या काही प्रीमियम आणि स्पेशल डेबिट कार्ड्ससाठी एटीएममधून कॅश काढण्याच्या नियमात महत्त्वाचा बदल केला आहे.
नवी दिल्ली : नवी लिमिट 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. या अंतर्गत ज्या कार्ड्सवर पहिलेज रोज 1 लाख रुपये काढण्याची मर्यादा होता. ती कमी होऊन 50 हजार रुपये होईल. तर काही हाय-एंड कार्ड्सची लिमिट 1.5 लाखांनी कमी होऊन 75 हजार रुपये राहील. खरंतर इतर डेबिट कार्ड्स आणि पीओएस, ई-कॉमर्स आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंटच्या लिमिटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबीने आपल्या काही डेबिट कार्ड्ससाठी एटीएममधून कॅश काढण्याची डेली लिमिट कमी केली आहे. हा बदल 50 टक्केपर्यंत आहे. ही नवी लिमिट 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल.
बँकेने म्हटले आहे की, हे पाऊल रिस्क कंट्रोल मजबूत करण्यासाठी, ग्राहक सुरक्षा वाढवण्यासाठी आणि सुरक्षित डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी उचलण्यात आले आहे. याचा परिणाम पीएनबीच्या अनेक प्रीमियम आणि विशेष डेबिट कार्डांवर होईल.
यापूर्वी काही कार्ड्सवर रोज 1 लाख रुपयांपर्यंत कॅश काढू शकत होते. आता ते कमी होऊन 50 हजार रुपये होईल. अशा प्रकारे काही हाय-एंड कार्ड्सवर 1.5 लाखांनी कमी होऊन 75 हजार रुपये राहील. मात्र इतर सर्व डेबिट कार्ड्सच्या लिमिटमध्ये कोणताही बदल होणार नाही. सोबतच पीओएस म्हणजेच दुकानांवर पेमेंट, ई-कॉमर्स आणि कॉन्टॅक्टलेस ट्रांझेक्शनची लिमिट पहिल्यासारखीच राहील.
advertisement
कोणत्या कार्डांवर परिणाम होईल?
पहिल्या श्रेणीतील कार्डे, जिथे लिमिट 1 लाख रुपयांवरून 50 हजार रुपयांपर्यंत कमी केली जात आहे, त्यात रुपे एनसीएमसी प्लॅटिनम डोमेस्टिक डेबिट कार्ड, रुपे एनसीएमसी प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड, रुपे महिला पॉवर प्लॅटिनम डेबिट कार्ड, रुपे पीएनबी पलाश डेबिट कार्ड - रीसायकल केलेले पीव्हीसी डेबिट कार्ड, रुपे बिझनेस प्लॅटिनम एनसीएमसी डेबिट कार्ड, मास्टरकार्ड प्लॅटिनम डेबिट कार्ड, व्हिसा गोल्ड डेबिट कार्ड आणि पीएनबी मास्टरकार्ड प्लॅटिनम राईज यांचा समावेश आहे.
advertisement
दुसऱ्या कॅटेगिरीमध्ये ज्या कार्ड्सवर लिमिट 1.5 लाखांनी कमी होऊन 75 हजार रुपये होत आहे. त्यामध्ये RuPay सेलेक्ट डेबिट कार्ड,पीएनबी रुपे सेलेक्ट नियो, पीएनबी RuPay सेलेक्ट एक्सेल, व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्ड आणि मास्टरकार्ड बिझनेस डेबिट कार्ड.
लिमिट कशी रिसेट करावी?
पीएनबीने ग्राहकांना सांगितेल की, तुम्हाला जास्त लिमिट हवी असेल तर ती स्वतः सेट किंवा रिसेट करु शकता. मात्र ही नव्या लिमिटच्या आत होईल. इंटरनेट बँकिंग, मोबाईल अॅप पीएनबी वन, आयव्हीआर किंवा व्हॉट्सअॅप बँकिंगने हे काम केले जाऊ शकते.
advertisement
इंटरनेट बँकिंगसाठी सर्वात आधी लॉगिन करा. व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेजमद्ये डेबिट कार्ड पर्सनलायजेशन निवडा. नंतर अकाउंट नंबर आणि सर्व्हिस सारखी एटीएम लिमिट निवडा. कार्ड डिटेल्स टाका, नवीन लिमिट टाका, ओटीपीने कंफर्म करा. यशस्वी झाल्यावर मेसेज येईल.पीएनबी वन अॅपसह हे आणखी सोपे आहे. अॅप उघडा, सर्व्हिसेजमध्ये डेबिट कार्ड निवडा. नंतर एटीएम लिमिट अपडेट करा किंवा इतर लिमिट क्लिक करा. अकाउंट आणि कार्ड निवडा, सध्याची लिमिट पहा, नवीन लिमिट प्रविष्ट करा आणि व्यवहार पासवर्डसह कन्फर्म करा. लिमिट अपडेट केली जाईल.
advertisement
हा बदल ग्राहकांसाठी थोडा परिणाम करु शकतो. विशेषतः जे मोठ्या अमाउंटमध्ये कॅश काढतात. मात्र बँका म्हणतात की, डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देणे आणि सिक्योरिटीसाठी हे आवश्यक आहे. बँकेने स्पष्ट म्हटलेय की, इतर ट्रांझेक्शन जसं की, ऑनलाइन किंवा दुकानवर पेमेंटमध्ये कोणताही बदल होणार नाही. अशावेळी जास्तीत जास्त डिजिटल पद्धत फॉलो करणे बेस्ट ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 5:04 PM IST
मराठी बातम्या/मनी/
PNB बँकेत अकाउंट असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एटीएम संबंधित नियमात महत्वाचा बदल







