रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री, आजपासून तिकीटाच्या दरात वाढ, इथे पाहा नवे दर

Last Updated:

रेल्वे मंत्रालयाने आजपासून मेल, एक्स्प्रेस, राजधानी, वंदे भारतसह अनेक गाड्यांच्या भाड्यात वाढ केली आहे. लोकल आणि सीझन तिकिटांमध्ये बदल नाही, नोकरदारांना दिलासा.

News18
News18
Train ticket price hike: नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वीच रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार, आज २६ डिसेंबर पासून रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकाच वर्षात दुसऱ्यांदा रेल्वेने ही भाडेवाढ केली असून, यापूर्वी जुलै महिन्यात दर वाढवण्यात आले होते. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यात प्रति किलोमीटर २ पैसे वाढ करण्यात आली आहे.
लोकल तिकीट आणि पास वाढणार का?
यामध्ये स्लीपर क्लास, एसी चेअर कार, एसी ३-टियर, एसी २-टियर आणि एसी फर्स्ट क्लास या सर्व श्रेणींचा समावेश आहे. तर, साध्या नॉन-एसी (बिगर उपनगरीय) प्रवासासाठी स्लीपर आणि फर्स्ट क्लाससाठी प्रति किलोमीटर १ पैसा वाढ करण्यात आली आहे. या सगळ्यात लोकल प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. उपनगरीय रेल्वे (लोकल) सेवा आणि सीझन तिकिटांच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
प्रवासाचे अंतर (किमी),भाड्यातील वाढ (रुपये)
० ते २५० किमी, कोणतीही वाढ नाही
२५१ ते ७५० किमी,५ रुपये
७५१ ते १२५० किमी,१० रुपये
१२५१ ते १७५० किमी,१५ रुपये
१७५१ ते २२५० किमी,२० रुपये
कोणत्या गाड्यांचे तिकीट वाढले?
राजधानी, शताब्दी, दुरंतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, अमृत भारत आणि नमो भारत रॅपिड रेल यांसारख्या प्रमुख गाड्यांच्या मूळ भाड्यात सुधारणा करण्यात आली असून आता या गाड्यांचा प्रवास महागणार आहे. रेल्वेने आपल्या तांत्रिक आणि प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच आधुनिक गाड्यांच्या देखभालीसाठी हा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, सलग दोनवेळा झालेल्या या वाढीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. सुधारित दर आजपासूनच आरक्षण खिडक्या आणि ऑनलाइन बुकिंगवर लागू झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री, आजपासून तिकीटाच्या दरात वाढ, इथे पाहा नवे दर
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं सगळं सांगितल
  • सरतं वर्ष २०२५ हे सोनं-चांदीसाठी ऐतिहासिक ठरलं.

  • सोनं-चांदीच्या दरात आलेल्या तेजीने गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षा जबरदस्त रिट

  • आता पुढील २०२६ वर्षात कोण अधिक रिटर्न देईल, यावर एक्सपर्टने भाष्य केलं आहे.

View All
advertisement