Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला करा फायद्याचा बिझनेस, मुंबई मिळतेय 25 पैशांत राखी, पाहा Location
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठा सजल्या असून तुम्ही देखील यंदा चांगला बिझनेस करू शकता. मुंबईत होलसेल दरात अगदी 25 पैशांपासून राखी मिळत आहेत.
मुंबई: भाऊ-बहिणीच्या नात्यातील ऋणानुबंध जपणारा रक्षाबंधन हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आतापासूनच बाजारपेठा रंगीबेरंगी राख्यांनी सजू लागल्या आहेत. तुम्ही देखील यंदा रक्षाबंधनला राखी विक्रीतून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील मस्जिद बंदर परिसर आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. भुलेश्वर मार्केटमध्ये अगदी 25 पैशांत राखी मिळत असून तुम्ही होलसेल दरात विविध व्हरायटी आणि रंगाच्या राख्या घेऊ शकता. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
भुलेश्वर मार्केटमध्ये पारंपरिक राख्यांपासून आधुनिक राख्यांपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. सर्वात कमी दराची राखी फक्त 25 पैसे प्रती नग या दराने उपलब्ध असून, ही पारंपरिक लाल-हिरव्या रंगांची झिरमिरी राखी आहे. चमकदार मोत्यांची राखी 12 रुपये डझनपासून तर रंगीबेरंगी मण्यांनी सजलेली राखी 4 रुपये प्रति नगापासून सुरू होते.
advertisement
लहान मुलांसाठी खास राख्या
लहान मुलांसाठी कार्टून राख्यांची विशेष रेलचेल आहे. छोटा भीम, डोरेमॉन, स्पायडरमॅन यांसारख्या डिझाईन्समध्ये मिळणाऱ्या राख्या 48 रुपये डझन दराने विकल्या जात आहेत. तसेच, बटण दाबल्यावर लखलखणारी लाईटिंग राखी 20 रुपये प्रती पीस दराने उपलब्ध आहे.
अगदी स्वस्तात राखी
मेटॅलिक चमक असलेल्या चांदीसारख्या राख्या 17 रुपये पीस दराने मिळत असून, जड मण्यांच्या राख्या 126 रुपये डझन पासून सुरू होतात. हाताने तयार केलेल्या राख्या 36 रुपये डझन दराने विकल्या जात आहेत. अमेरिकन डायमंड (AD) राख्यांचा देखील पर्याय येथे आहे, त्यांची किंमत 305 रुपये डझन आहे. रुद्राक्ष राख्या 21 रुपये डझन दराने मिळतात. या बाजारातील विविधता आणि माफक दरामुळे मज्जिद बंदर पुन्हा एकदा राखी खरेदीसाठी हॉटस्पॉट बनलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 16, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनला करा फायद्याचा बिझनेस, मुंबई मिळतेय 25 पैशांत राखी, पाहा Location