Success Story: अनेक संकटे आली, खचून न जाता सुरू केलं नाश्ता सेंटर, रमेश यांच्या यशाची कहाणी, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
3 वर्षांपासून एक छोटंसं पिकअप वाहन अनेकांसाठी सकाळच्या नाश्त्याची आणि चहाची सोय बनले आहे. रमेश चव्हाण हे या नाश्ता सेंटरचे मालक चहा, पोहे, कढी आणि इतर विविध प्रकारच्या नाश्त्याची चवदार मेजवानी ते ग्राहकांना देतात.
छत्रपती संभाजीनगर : येथे जालना रोडवर, चिकलठाणा परिसरातील मिनी घाटीजवळ गेल्या 3 वर्षांपासून एक छोटंसं पिकअप वाहन अनेकांसाठी सकाळच्या नाश्त्याची आणि चहाची सोय बनले आहे. रमेश चव्हाण हे या नाश्ता सेंटरचे मालक चहा, पोहे, कढी आणि इतर विविध प्रकारच्या नाश्त्याची चवदार मेजवानी ते ग्राहकांना देतात. विशेष म्हणजे, या छोट्या व्यवसायातून चव्हाण दर महिन्याला तब्बल 45 ते 50 हजार रुपये कमावतात. सुरुवातीच्या काळात त्यांना शेती विकावी लागली अनेक संकटे आली मात्र आज ते त्यांच्या नाश्ता सेंटरमुळे भक्कम उभे राहिले आहेत.
चव्हाण हे शेतकरी कुटुंबातील. काही वर्षांपूर्वी ते शेती करायचे, वेळोवेळी निसर्गाने साथ न दिल्यामुळे त्यांचा मोसंबीचा असलेला फळबाग काढावा लागला. त्या काळात शेती विकावी लागली आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे येऊन ते स्थायिक झाले आणि जालना रोडवरील चिकलठाणा येथील मिनी घाटी परिसरात छोट्या पिकअप गाडीतून चहा नाश्ता सेंटर सुरू केले.
advertisement
नाश्ता सेंटर सुरू करण्यासाठी शेतीतील सर्व अवजारे त्यांना विकावी लागली त्यामध्ये दोन बैलांचा तर इतर साहित्यांचा देखील समावेश आहे. या अवजारांच्या विक्रीच्या पैशातून त्यांनी नाश्ता सेंटरचा व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
advertisement
नाश्ता सेंटरच्या व्यवसायाबरोबरच ते वेट लॉस जर्नी येथे देखील काम करतात. ज्यांचे वजन वाढले असेल त्यांना योग्य सल्ला देणे तसेच आहाराबद्दल मार्गदर्शन करणे यातून ते 15 ते 20 हजार रुपयांची कमाई करतात असे एकूण जवळपास 50 हजार रुपयांची महिन्याला ते कमाई करत आहेत. तसेच चव्हाण तरुणांना सांगतात की नोकरी प्रत्येकाला मिळेल असे शक्य नाही त्यामुळे तरुणांनी व्यवसायात यावे मात्र तरुणांना व्यवसाय कमी वाटतो. मात्र व्यवसाय कमी प्रगती करणारा आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
July 24, 2025 4:17 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story: अनेक संकटे आली, खचून न जाता सुरू केलं नाश्ता सेंटर, रमेश यांच्या यशाची कहाणी, Video