सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री!100 रुपयांचा स्टँप झाला थेट पाचशेला
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सर्वसामान्यांना विविध कामांसाठी लागणारा स्टँप आता 100 रुपयांच्या जागी थेट 500 ला झाला आहे. सरकारने ही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
मुंबई : वैयक्तिक काही महत्त्वाची कामं असोत किंवा मग सरकारी कामं, सर्वांनाच स्टँपची गरज पडत असते. नागरिकांना फक्त 100 रुपयांच्या स्टँप पेपरवरून कागदपत्र तयार करता येत होती. 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टँपवर नागरिक आपली कागदपत्र तयार करत होते. मात्र आता 100 रुपयांचा स्टँप पेपर हा बंद होणार आहे. नोटरी करणं असो किंवा मग बँकेमधून कर्ज घ्यायचं असो या सर्वांसाठी हा 100 रुपयांचा स्टँप पेपर सर्वसामान्यांना कामी यायचा. मात्र आता सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण 100 रुपयांचा स्टँप पेपर आता बंद झाला आहे. आता कमीत कमी 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र देण्यात येणार आहेत.
advertisement
का घेण्यात आला हा निर्णय?
राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे. याच कारणामुळे महसूल विभागाकडून आता फक्त 500 रुपयांचा स्टँप जारी करण्यात येईल. याच कारणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खर्चात वाढ होईल. महसूल वाढावा यासाठीच राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
advertisement
लाडकी बहीण योजनेसाठी निधी होतोय खर्च, म्हणून निर्णय?
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यामध्ये राज्यातील महिलांना दीड हजार रुपये दरमहा दिले जाताय. या योजनेत पैसा वाटला जात असल्याने इतर योजनांसाठी निधी कमी पडतोय. म्हणूनच सरकारने महसुलात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. मात्र याचा परिणाम हा सर्वसामान्य नागरिकांवरच होणार आहे. कारण ज्या गोष्टीसाठी 100 रुपये खर्च करावे लागत होते. तिथे आता थेट 500 रुपये द्यावे लागतील. यासोबतच सरकारी कार्यालयांमधील कामांसाठी मुद्रांक शुल्क माफीचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे. या निर्णयात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती मिळतेय.
advertisement
यापूर्वी फक्त यांनाच द्यावे लागत होते 500 रुपये यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांना केवळ 100 किंवा 200 रुपये द्यावे लागत होते. मात्र कंपन्यांच्या एकत्रीकरण, विलनीकरण किंवा भविष्यात कोणतेही मतभेद मिटवताना लेखी निर्णय देण्यात येतो. कंपन्यांचं भागभांडवल हे मोठं असतं. याच कारणामुळे त्यांना स्थावर आणि जंगम मालमत्तेप्रकरणी अभिहस्तांतरणात 500 रुपये मोजावे लागतात. मात्र आता सर्वसामान्यांनाही 500 रुपयेच मोजावे लागतील.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 03, 2024 4:33 PM IST







