No Cost EMI मार्फत खरेदी करणं खरंच ग्राहकांसाठी फायदेशीर आहे? जाणून घ्या सत्य

Last Updated:

सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स साइट्सवर सुरू असलेल्या सेलमध्ये 'नो कॉस्ट ईएमआय' सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

नो कॉस्ट ईएमआय
नो कॉस्ट ईएमआय
मुंबई : आजकाल लोकांच्या गरजा फार वाढल्या आहेत. त्यामुळे विविध वस्तूंच्या खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खरेदी-विक्रीतील वाढीमुळे व्यावसायिकांच्या बिझनेसमध्ये आणि मार्केटमधील स्पर्धेतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जास्तीत-जास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी विशेष ऑफर्स, डिस्काउंट्स दिले जातात. 'नो कॉस्ट ईएमआय' सुविधा देखील याच आकर्षक ऑफर्सचा एक भाग आहे. सध्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स साइट्सवर सुरू असलेल्या सेलमध्ये 'नो कॉस्ट ईएमआय' सुविधेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. ग्राहकाला वाटतं की, 'नो कॉस्ट ईएमआय' हा एक अतिशय सोयीस्कर आणि फायदेशीर व्यवहार आहे. पण, प्रत्यक्षात हा फक्त एक भ्रम आहे.
'नो कॉस्ट ईएमआय' ऑफर करण्यापूर्वीच कंपन्या संबंधित उत्पादनावर चांगली सूट घेतात. तुम्हाला ऑफर केलेल्या किमतीमध्ये ती सूट समाविष्ट केलेली नसते. उदाहरणार्थ, तुम्ही शोरूममधून 25 हजार रुपयांचा मोबाइल खरेदी करत आहात. तुम्ही 'नो कॉस्ट ईएमआय' सुविधेचा लाभ घेऊन 25 हजार रुपयांची रक्कम ईएमआयमध्ये रूपांतरित करून घेतली आहे. तुम्हाला वाटतं की, तुम्ही फोनची योग्य ती किंमत देत आहात. पण, तुम्हाला ऑफर केलेल्या किमतीवर फायनान्स कंपनीला फोन निर्मात्याकडून आधीच सवलत मिळालेली असते. कंपनीने 25 हजार रुपयांचा मोबाईल 18 किंवा 20 हजार रुपयांना विकत घेतलेला असेल. त्यामुळे जेव्हा कंपनी तुम्हाला ऑफर केलेल्या किंमतीवर 'नो कॉस्ट ईएमआय' ऑप्शन देते तेव्हा कंपनीचं कोणतंही नुकसान होत नाही.
advertisement
याशिवाय, जर एखाद्या प्रॉडक्ट्च्या विक्रीवर 10 टक्के किंवा 20 टक्के सवलत दिली जात असेल, तर त्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एकरकमी पेमेंट करावं लागतं. संबंधित प्रॉडक्ट तुम्ही 'नो कॉस्ट ईएमआय' सुविधेसह खरेदी केलं तर तुम्हाला ती सवलत मिळणार नाही. 'नो कॉस्ट ईएमआय'ची सुविधेचा वापर करताना तुमच्याकडून प्रोसेसिंग फी देखील घेतली जाते. याशिवाय, व्याजावर 18 टक्के जीएसटी आणि बँक सेवा शुल्क देखील तुमच्याकडून वसूल केलं जातं.
advertisement
या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियम सांगतो की, कोणतंही कर्ज कधीही मोफत मिळत नाही. जेव्हा तुम्ही बँकेकडून कोणतंही कर्ज घेता तेव्हा व्याजासह तुमचा ईएमआय मोजला जातो. क्रेडिट कार्डमधील आउटस्टँडिंग्जवर 'नो कॉस्ट ईएमआय' स्कीममध्ये व्याजाची रक्कम अनेकदा प्रक्रिया शुल्काच्या रुपात वसूल केली जाते. झिरो कॉस्ट ईएमआयच्या बाबतीत आरबीआयने बँकांना स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की, अशा कर्जांमध्ये व्याजदरांबाबत कोणतीही पारदर्शकता नसते. त्यामुळे अशी कोणतीही ऑफर टाळली पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
No Cost EMI मार्फत खरेदी करणं खरंच ग्राहकांसाठी फायदेशीर आहे? जाणून घ्या सत्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement