ATM वापर महागणार, इंटरचेंज फी वाढीनंतर SBI चे नवे चार्जेस लागू; ग्राहकांना बसणार फटका

Last Updated:

जर तुम्ही एसबीआयचे सामान्य बचत खातेधारक असाल, तर तुम्हाला इतर बँकांच्या एटीएमवर मिळणाऱ्या मोफत व्यवहारांच्या संख्येत बदल झालेला नाही. मात्र, ही मर्यादा ओलांडल्यानंतर आता तुम्हाला जास्त शुल्क द्यावे लागणार आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या धावपळीच्या जगात खिशात रोकड नसेल, तर आपण सर्वात आधी जवळचं एटीएम शोधतो. बँकिंग डिजिटल झालं असलं तरी, ऐनवेळी लागणाऱ्या रोख रकमेसाठी आपण एटीएमवरच अवलंबून असतो. पण, जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल, तर आता एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. कारण, 1 डिसेंबर 2025 पासून एसबीआयने आपल्या एटीएम व्यवहार शुल्कात मोठी सुधारणा केली आहे. इंटरचेंज शुल्कात वाढ झाल्यामुळे बँकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय बदललं?
जर तुम्ही एसबीआयचे सामान्य बचत खातेधारक असाल, तर तुम्हाला इतर बँकांच्या एटीएमवर मिळणाऱ्या मोफत व्यवहारांच्या संख्येत बदल झालेला नाही. मात्र, ही मर्यादा ओलांडल्यानंतर आता तुम्हाला जास्त शुल्क द्यावे लागणार आहे.
आधी ही मर्यादा ओलांडल्यावर 21 रुपये + GST लागायचे, आता ते 23 रुपये + GST इतके झाले आहेत.
advertisement
तर बिगर-वित्तीय व्यवहार (Non-Financial): बॅलन्स चेक करणे किंवा मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी आता 10 रुपयांऐवजी 11 रुपये + GST द्यावे लागतील.
सॅलरी अकाउंट (पगार खाते) असलेल्यांना मोठा झटका
आतापर्यंत एसबीआयच्या सॅलरी पॅकेज खातेधारकांना इतर बँकांच्या एटीएमवर अमर्यादित (Unlimited) मोफत व्यवहार करण्याची मुभा होती. मात्र, नव्या नियमांनुसार ही सुविधा आता बंद झाली आहे.
advertisement
आता सॅलरी अकाउंट धारकांना महिन्यातून फक्त 10 मोफत व्यवहार (इतर बँकांच्या एटीएमवर) करता येतील.
10 व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर, सामान्य बचत खात्याप्रमाणेच 23 रुपये (वित्तीय) आणि 11 रुपये (बिगर-वित्तीय) अधिक जीएसटी असे शुल्क आकारले जाईल.
बँकेने सर्वच ग्राहकांवर हा भार टाकलेला नाही. काही गोष्टी अजूनही पूर्वीप्रमाणेच आहेत.
1.. एसबीआय एटीएमचा वापर: जर तुम्ही एसबीआयच्याच डेबिट कार्डने एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढले, तर त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे व्यवहार पूर्वीप्रमाणेच मोफत राहतील.
advertisement
2. BSBD खातेधारक: बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट (BSBD) खाते असलेल्या ग्राहकांसाठी नियमांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यांना जुन्याच सवलती मिळत राहतील.
शुल्कात वाढ का करण्यात आली?
बँकेने स्पष्ट केले आहे की, 1 फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच हे शुल्क बदलण्यात आले आहे. इतर बँकांच्या एटीएम नेटवर्कचा वापर करताना द्यावे लागणारे 'इंटरचेंज फी' वाढल्यामुळे बँकेने हा खर्च आता ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
बँकिंग ट्रान्झॅक्शन करताना आता प्रत्येक व्यवहाराचा हिशोब ठेवणे गरजेचे झाले आहे. अनावश्यक शुल्क टाळण्यासाठी शक्यतो स्वतःच्याच बँकेचे एटीएम वापरणे किंवा डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडणे आता जास्त फायदेशीर ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
ATM वापर महागणार, इंटरचेंज फी वाढीनंतर SBI चे नवे चार्जेस लागू; ग्राहकांना बसणार फटका
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement