SBI Alert: खिशात पैसे ठेवा! ऑनलाईन पेमेंट होणार नाही, SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय स्टेट बँकेच्या UPI सेवा ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १२:१५ ते १:०० या काळात तांत्रिक देखभालीसाठी बंद राहतील, मात्र UPI Lite सेवा सुरू राहील.
तुम्ही ऑनलाईन पेमेंट करत असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण ऑनलाईन पेमेंट करताना ते होणार नाही किंवा अडचणी येण्याची शक्यता आहे. देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेने दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक कामामुळे ४ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १२:१५ वाजेपासून ते १:०० वाजेपर्यंत UPI सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.
या काळात ग्राहकांना UPI व्यवहार करता येणार नाहीत. मात्र, SBI ने सांगितलं आहे की UPI Lite Service या कालावधीत सुरू राहील, त्यामुळे ग्राहक छोटे व्यवहार विनाअडथळा करू शकणार आहेत. मात्र फोन पे, गुगल पे किंवा इतर थर्ड पार्टी पेमेंट अॅपवरुन SBI द्वारे पेमेंट करता येणार नाही. तुम्ही थोडे पैसे ठेवा किंवा SBI लाइट सर्व्हिस पेमेंट करण्यासाठी वापरावं अशी विनंती बँकेनं केली आहे.
advertisement
नेमकं हे UPI Lite म्हणजे काय?
UPI Lite ही अशी सेवा आहे जी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन नसतानाही लहान रक्कमेचे व्यवहार करण्याची सुविधा देते. या सेवेत बँक अकाउंटशी थेट व्यवहार न होता, एका डिजिटल वॉलेटमधून रक्कम वळवली जाते. त्यामुळे सर्व्हर डाउन किंवा बँकिंग नेटवर्कवर लोड असला तरी व्यवहार पूर्ण होतात. बँकेने सांगितलं की, देखभालीच्या काळात ग्राहकांनी या सुविधेचा वापर करावा, जेणेकरून दैनंदिन व्यवहार थांबणार नाहीत.
advertisement
Due to scheduled maintenance activity, SBI UPI services will be temporarily unavailable from 00:15 hrs to 01:00 hrs on 04.11.2025 (IST). Customers may continue to use UPI Lite Services for uninterrupted service. We regret the inconvenience caused to our customers.
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 2, 2025
advertisement
देखभालीमागचं कारण
SBI दर काही काळानंतर आपल्या डिजिटल पेमेंट सिस्टीमची तांत्रिक देखभाल आणि सुधारणा करत असते. UPI ही देशभरात दररोज लाखो व्यवहार करणारी प्रणाली आहे. त्यामुळे सर्व्हरची गती, सुरक्षा आणि ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग कार्यक्षमता टिकवण्यासाठी अशा देखभाल प्रक्रिया आवश्यक असतात. या देखभालीनंतर बँकिंग सेवांचा वेग आणि स्थैर्य आणखी वाढेल, असं SBI ने म्हटलं आहे.
advertisement
ग्राहकांसाठी सल्ला
view commentsया दरम्यान ज्यांना मध्यरात्रीनंतर व्यवहार करायचे असतील त्यांनी थोडं नियोजन करून ठेवावं, असं बँकेचं आवाहन आहे. मोठे व्यवहार किंवा बिल पेमेंट्स या वेळेपूर्वी पूर्ण करावेत, जेणेकरून कोणताही अडथळा येणार नाही. UPI Lite वापरून २०० रुपयांपर्यंतचे व्यवहार मात्र या काळातही करता येतील. SBI ही देशातील ५० कोटींपेक्षा जास्त ग्राहक असलेली बँक आहे आणि तिच्या UPI सेवांचा वापर लाखो लोक दररोज करतात. अशा वेळी तांत्रिक देखभालीबद्दल आधीच सूचना देऊन बँकेने पारदर्शकतेचं उदाहरण ठेवले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/मनी/
SBI Alert: खिशात पैसे ठेवा! ऑनलाईन पेमेंट होणार नाही, SBI ने ग्राहकांना दिला अलर्ट


