Stocks to Watch : मंगळवारी बाजारात मोठी ॲक्शन, 7 कंपन्यांनी Share Marketला दिले मोठे अपडेट; गुंतवणूकदारांची कसोटी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: शेअर बाजार बंद झाल्यानंतर जाहीर झालेल्या अधिग्रहण, मोठ्या ऑर्डर्स, प्रोजेक्ट मंजुरी आणि कॉर्पोरेट अपडेट्समुळे मंगळवारी काही शेअर्समध्ये जोरदार हालचाल पाहायला मिळू शकते. गुंतवणूकदारांसाठी अल्पकालीन ट्रेडिंग आणि दीर्घकालीन संधींच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.
मुंबई: सोमवार 22 डिसेंबर रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी स्टॉक एक्सचेंजला महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे मंगळवारी बाजार सुरू होताच या शेअर्समध्ये हालचाल (Action) पाहायला मिळू शकते. गुंतवणूकदारांचे लक्ष या शेअर्सकडे असण्याची शक्यता आहे.
advertisement
UPL :
कंपनीने आपल्या स्टेप-डाउन सब्सिडियरी Advanta Holdings B.V. च्या माध्यमातून Hybrid Seeds Vietnam Company Limited मध्ये शेअर्सचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला आहे. या अधिग्रहणाची एकूण किंमत 2,000 अमेरिकी डॉलर इतकी आहे. या व्यवहारानंतर Hybrid Seeds Vietnam ही कंपनी Advanta Enterprises Limited, भारत अंतर्गत एक स्टेप-डाउन सब्सिडियरी बनेल. Advanta Enterprises Limited मध्ये UPLचा 78.21 टक्के हिस्सा आहे.
advertisement
Paytm :
Paytmची युनिट Paytm Cloud Technologies Limited (PCTL) ने आंतरराष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीने इंडोनेशिया आणि लक्झमबर्ग येथे दोन नवीन पूर्ण स्वामित्वाच्या सब्सिडियरी (Wholly Owned Subsidiaries – WOS) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. इंडोनेशिया आणि लक्झमबर्गमध्ये स्थापन होणाऱ्या या दोन्ही कंपन्या Paytmच्या स्टेप-डाउन पूर्ण स्वामित्वाच्या सब्सिडियरी असतील.
advertisement
Supreme Petrochem :
कंपनीने जाहीर केले आहे की महाराष्ट्रातील नागोठाणे येथील अमदोषी (Amdoshi) प्लांटचे कामकाज सध्या तात्पुरते बंद करण्यात आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, नव्याने उभारण्यात आलेल्या mABP प्लांटमधील एका महत्त्वाच्या उत्पादन उपकरणात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्लांटचे ऑपरेशन थांबवावे लागले. या बिघाडाची माहिती कंपनीने संबंधित टेक्नॉलॉजी लायसेंसर आणि उपकरण पुरवठादाराला दिली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
advertisement
GPT Infra :
GPT Infraprojects Limited (GPT Infra) आणि ISCPPL यांच्या कन्सोर्शियमला NHAI च्या 670 कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी L-1 (सर्वात कमी बोलीदार) म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा प्रकल्प राजस्थानमधील जोधपूर शहरात फोर-लेन एलिव्हेटेड रोडच्या बांधकामाशी संबंधित आहे.
advertisement
Man Industries :
कंपनीने स्पष्ट केले आहे की इन्कम टॅक्स विभागाकडून करण्यात आलेली शोध (Search) कारवाई पूर्ण झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या तपास प्रक्रियेदरम्यान तिने पूर्ण सहकार्य केले असून, या कारवाईचा कंपनीच्या दैनंदिन व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही.
Saatvik Green Energy :
advertisement
कंपनीची युनिट Saatvik Solar Industries Private Limited ला सोलर क्षेत्रात मोठा ऑर्डर मिळाला आहे. या मटेरियल सब्सिडियरीला मिळालेल्या ऑर्डरची एकूण किंमत 486 कोटी रुपये इतकी आहे. या ऑर्डरअंतर्गत कंपनी सोलर PV मॉड्यूल्सचा पुरवठा करणार आहे.
Adani Energy Solutions Limited :
कंपनीने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर दिलेल्या माहितीनुसार, तिच्या पूर्ण स्वामित्वाच्या सब्सिडियरी Adani Transmission Step-One Limited ने ATSOL Global IFSC Limited नावाची एक नवी सब्सिडियरी स्थापन केली आहे. एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने नमूद केले आहे की 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 3:51वाजता (IST) या कंपनीच्या नोंदणीची माहिती MCA (Ministry of Corporate Affairs) कडून प्राप्त झाली आहे. दरम्यान Adani Energy Solutions चा शेअर सोमवारी 2.18 टक्क्यांच्या वाढीसह 1,009.80 रुपयांवर बंद झाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 8:34 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Stocks to Watch : मंगळवारी बाजारात मोठी ॲक्शन, 7 कंपन्यांनी Share Marketला दिले मोठे अपडेट; गुंतवणूकदारांची कसोटी











