शेअर मार्केटमध्ये महाक्रॅश, काही मिनिटांत कोट्यवधींचा चुराडा, सोन्या चांदीने छप्पर फाडलं, पुढे काय?

Last Updated:

सेंसेक्स १००० अंकांनी, निफ्टी २८५ अंकांनी घसरले. रुपया ९१.२८ नीचांकी, विदेशी गुंतवणूकदारांची एक्झिट, सोन्या-चांदीचे दर विक्रमी, इंडिया VIX वाढला, बाजारात अस्थिरता.

News18
News18
अरे देवा हे काय होतंय असं तुम्हालाही एक क्षण वाटलं असेल. सोन्या चांदीचे दर छप्पर फाडून गगनाला भिडले आहेत. दर फक्त उघड्या डोळ्यांनी पाहात राहायचे. खरेदी करायचं तर विसरुनच जायचं. हे सगळं सुरू असताना आता भारतीय शेअर बाजारासाठी आजचा बुधवार ब्लॅक वेनिसडे ठरला आहे.
'मनी कंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या आठ महिन्यांतील सर्वात मोठ्या घसरणीनंतर आजही बाजार सावरू शकला नाही. शेअर मार्केटमध्ये मोठा क्रॅश आला. सकाळच्या सत्रातच सेंसेक्स जवळपास 1000 अंकांनी कोसळून ८१,२३५ वर आला, तर निफ्टी २८५ अंकांनी घसरून २५,००० च्या पातळीवर आली आहे. एका बाजूला शेअर बाजार रसातळाला जात असताना दुसरीकडे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा सोन्या-चांदीकडे वळवल्याने मौल्यवान धातूंनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.
advertisement
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक- डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ३१ पैशांनी कमकुवत होऊन ९१.२८ या आपल्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतल्याचा थेट परिणाम चलनावर झाला आहे. रोज रुपयाचं मूल्य घसरत असल्याने आणि डॉलर जागतिक स्तरावर अधिक मजबूत होत असल्याने
विदेशी गुंतवणूकदारांची 'एक्झिट': परकीय संस्थागत गुंतवणूकदार जानेवारी महिन्यात सतत विक्री करत आहेत. जानेवारीत आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी ३२,२५३ कोटी रुपये भारतीय बाजारातून बाहेर काढले आहेत.
advertisement
अमेरिका-युरोप 'ट्रेड वॉर'ची भीती: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँड संदर्भातील आक्रमक धोरणांमुळे आणि युरोपीय देशांवर २५% टॅरिफ लावण्याच्या धमकीमुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण आहे. यामुळे अमेरिकन बाजारासह आशियाई बाजारही लाल निशाणात आहेत.
तिमाही निकालांचा झटका: दिसंबर तिमाहीचे निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे राहिलेले नाहीत. विशेषतः आयटी (IT) आणि बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या कमकुवत कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगला आहे.
advertisement
इंडिया VIX मध्ये मोठी वाढ: बाजारातील भीती दर्शवणारा 'इंडिया VIX' इंडेक्स ४ टक्क्यांनी वाढला आहे. याचा अर्थ असा की, येणाऱ्या काही दिवसांत बाजारात आणखी मोठी अस्थिरता किंवा घसरण पाहायला मिळू शकते.
सोन्या-चांदीकडे कल: जेव्हा शेअर बाजार कोसळतो, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळतात. चांदीने आज ३ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करून नवा इतिहास रचला आहे, तर सोन्याचे दरही कडाडले आहेत.
advertisement
बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत जागतिक पातळीवरील भू-राजकीय तणाव निवळत नाही आणि रुपया स्थिर होत नाही, तोपर्यंत बाजारात मोठी तेजी येणे कठीण आहे. निफ्टीसाठी आता २४,८००० चा स्तर महत्त्वाची आधार पातळी असेल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
शेअर मार्केटमध्ये महाक्रॅश, काही मिनिटांत कोट्यवधींचा चुराडा, सोन्या चांदीने छप्पर फाडलं, पुढे काय?
Next Article
advertisement
ZP Election NCP: घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी मोठा डाव...
घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार! पुण्यात पवारांकडून जिल्हा परिषदसाठी म
  • आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा जोरात सुरू

  • राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून

View All
advertisement