Share Market update: 3 रुपयांच्या पेनी स्टॉकने मिळवून दिले 3 लाख सध्या काय स्थिती?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांत हा शेअर 21 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच 53,458.90 रुपयांनी वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये एल्सिड इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या शेअर्सची जोरदार चर्चा आहे. 2011 पासून या कंपनीचा शेअर तीन रुपयांच्या आसपास होता. आता कंपनीच्या शेअरची किंमत कित्येक पटींनी वाढली आहे. एल्सिड इन्व्हेस्टमेंट हा देशातील सर्वांत महागडा स्टॉक बनला आहे. कंपनीच्या शेअर्सनं आज (6 नोव्हेंबर) तीन लाख रुपयांची पातळी ओलांडून नवा इतिहास रचला आहे. कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांनी वाढून 301521.40 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले आहेत. ही त्याची 52 आठवड्यांतील नवीन उच्चांकी किंमत आहे. गेल्या चार ट्रेडिंग दिवसांपासून हा स्टॉक सतत 5 टक्क्यांचं अप्पर सर्किट लावत आहे. आजही या शेअरवर बायर्सच्या उड्या पडताना दिसत आहेत. गेल्या पाच ट्रेडिंग दिवसांत हा शेअर 21 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच 53,458.90 रुपयांनी वाढला आहे.
या कंपनीचा शेअर 2011 पासून तीन रुपयांच्या आसपास होता. एशियन पेंट्समधील त्याच्या स्टेकनुसार या शेअर्सचे मूल्य 5.85 लाख रुपये असल्याचं मानलं जात होतं. पण, ही त्याची योग्य किंमत नव्हती. कंपनीच्या भागधारकांना तो कमी किमतीत विकायचा नव्हता. त्यामुळे सेबीने कंपनीला स्पेशन कॉल ऑक्शनद्वारे शेअर्सचं खरं मूल्य शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (बीएसई) होल्डिंग कंपन्यांच्या किंमतीबाबत स्पेशल कॉल ऑक्शन आयोजित केला होता. या लिलाव सत्रात एल्सिडच्या शेअरची किंमत 2.25 लाख रुपये निश्चित करण्यात आली. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे शेअर्स 29 ऑक्टोबर रोजी बीएसईवर पुन्हा लिस्ट झाले.
advertisement
शेअरची लिस्टिंग किंमत 2.25 लाख रुपये होती. पण, या स्मॉलकॅप स्टॉकने दलाल स्ट्रीटवर इतिहास रचत तो 2,36,250 रुपयांवर पोहचला. शेअरच्या किमतीत 66,92,535 टक्क्यांनी वाढ झाली. या वर्षी 21 जून रोजी हा शेअर फक्त 3.51 रुपयांचा पेनी स्टॉक होता. तेव्हापासून त्याचं ट्रेडिंग बंद झालं होतं. री-लिस्टिंगनंतर हा शेअर गेल्या चार दिवसांपासून सतत अप्पर सर्किटमध्ये आहे.
advertisement
एल्सिड इन्व्हेस्टमेंट ही आरबीआयकडे 'गुंतवणूक कंपनी श्रेणी' अंतर्गत नोंदणी असलेली एनबीएफसी आहे. कंपनीचा सध्या स्वतःचा कोणताही ऑपरेटिंग व्यवसाय नाही. पण, एशियन पेंट्ससारख्या इतर मोठ्या कंपन्यांमध्ये एल्सिडची मोठी गुंतवणूक आहे. या कंपनीचं मार्केट कॅपिटस 6,030.43 कोटी रुपये आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2024 11:36 AM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market update: 3 रुपयांच्या पेनी स्टॉकने मिळवून दिले 3 लाख सध्या काय स्थिती?


