50 रुपयांच्या शेअरने 7300 टक्के दिले रिटर्न, 50 हजारांचे झाले 3700000
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आर.आय.आर. पॉवर इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरने पाच वर्षांत 50 रुपयांवरून 2300 रुपयांपर्यंत वाढून 7300% परतावा दिला आहे. 20,000 रुपयांची गुंतवणूक 15 लाख झाली आहे.
मुंबई: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना अच्छे दिन पाहायला मिळत आहे. मार्केट पुन्हा रिकव्हर व्हायला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान असा एक शेअर आहे ज्याने गेल्या पाच वर्षात अक्षरश: पैशांच्या पाऊस पाडला आहे. आर.आय.आर. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स या सेमीकंडक्टर डिव्हाइसेस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर अवघ्या पाच वर्षांत 50 रुपयांवरून 2300 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. याचा अर्थ, गुंतवणूकदारांना 7300% चा अविश्वसनीय परतावा मिळाला आहे. फक्त एका वर्षातच हा शेअर 186% ने वाढला आहे, ज्यामुळे लहान गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले गेले आहे.
कंपनीची वाटचाल आणि वाढीचा आलेख
पूर्वी रुतोंसा इंटरनॅशनल रेक्टीफायर या नावाने ओळखली जाणारी ही कंपनी आता आर.आय.आर. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून कार्यरत आहे. गेल्या ५० वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीचे दोन मोठे प्लांट आणि १० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय विस्तार आहे.
गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा – 20,000 रुपयांचे 15 लाख कसे झाले?
advertisement
जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी फक्त 20,000 गुंतवले असते, तर आज त्याची किंमत सुमारे 15,00,000 झाली असती. ज्यांनी 50,000 रुपयांची गुंतवणूक केली त्यांना 37,00,000 रुपये मिळाले. 1,00,000 ची गुंतवणूक केलेल्यांचे 74,00,000 रुपये झाले आहेत. जर या कालावधीत शेअर्स विकले नसते, तर गुंतवणूकदारांनी कोट्यधीश होण्याची संधी मिळवली असती.
शेअरच्या वाढीमागचे प्रमुख कारणे
advertisement
19 मार्च 2025 रोजी, बीएसई वर 5% अपर सर्किट लागून शेअरची किंमत 2306 रुपयेवर बंद झाली. या शेअरने केवळ 2 आठवड्यांत 54 % तर एका आठवड्यात 21% ची वाढ नोंदवली. 2024 मध्ये कंपनीने 200 कोटींहून अधिक महसूल आणि 70 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि शेअरच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली.
advertisement
भविष्यातील संधी आणि धोके
आर.आय.आर. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स हा शेअर अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय मानला जात आहे. मात्र, जास्त वाढलेल्या किमतीमुळे जोखीमही वाढली असून, गुंतवणूक करण्याआधी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, हा शेअर पुढील काही वर्षांतही दमदार परतावा देऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 20, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
50 रुपयांच्या शेअरने 7300 टक्के दिले रिटर्न, 50 हजारांचे झाले 3700000