BPCL, बजाज आणि झोमॅटोसह 7 शेअर्समधून मिळणार चांगला रिटर्न, एक्सपर्टने सांगितलं टारगेट

Last Updated:

गुरुवारी निफ्टीच्या सर्वात वेगवान वाढणाऱ्या स्टॉक्सच्या यादीत बजाज फायनान्स, विप्रो, बीपीसीएल, इन्फोसिस आणि इंडसइंड बँक टॉपवर होते.

फाईल फोटो
फाईल फोटो
मुंबई: शेअर बाजारात मागच्या काही दिवसांपासून प्रचंड अस्थिरता आहे. येत्या काळात चांगले संकेत मिळणार असल्याचं बुधवार आणि गुरुवारच्या शेअर मार्केटच्या मूडवरुन दिसत आहे. जागतिक संकेतांमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार तेजीत उघडला. आठवड्याच्या शेवटी निफ्टी 28.40 अंकांनी म्हणजेच 0.12% वाढून 23,724.70 च्या पातळीवर उघडला. सेन्सेक्स 153.39 अंकांनी म्हणजेच 0.20% वाढून 78,424.67 च्या पातळीवर उघडला. त्याच वेळी, निफ्टी बँक 50.15 अंकांनी म्हणजेच 0.10% वाढून 50,393.20 च्या पातळीवर उघडला.
गुरुवारी निफ्टीच्या सर्वात वेगवान वाढणाऱ्या स्टॉक्सच्या यादीत बजाज फायनान्स, विप्रो, बीपीसीएल, इन्फोसिस आणि इंडसइंड बँक टॉपवर होते. सुरुवातीच्या कामकाजादरम्यान या स्टॉक्समध्ये 0.80% ते 1.3% पर्यंत वाढ दिसून आली. तर, निफ्टीच्या कमजोरी असलेल्या स्टॉक्सच्या यादीत अपोलो हॉस्पिटल्स, श्रीराम फायनान्स, ट्रेंट, आयटीसी आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश होता. यात 0.59% ते 1.6% पर्यंत घट दिसून आली.
advertisement
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार आज मार्केट एक्सपर्ट्सनी टेक्निकल चार्टच्या आधारावर 7 शेअर्सवर त्यांची मते दिली आहेत. हे शेअर्स आरती इंडस्ट्रीज, सीजी पॉवर, एमसीएक्स, झोमॅटो, अल्ट्राटेक सिमेंट, बीपीसीएल आणि इंटरग्लोब एव्हिएशनचे आहेत.
प्रकाश गाबा:
शेअर: आरती इंडस्ट्रीज
मत: खरेदी करा
टार्गेट : 490 रुपये प्रति शेअर
स्टॉपलॉस: 457 रुपये प्रति शेअर
मानस जयस्वाल:
शेअर: सीजी पॉवर
advertisement
मत: खरेदी करा
टार्गेट : 660 रुपये प्रति शेअर
स्टॉपलॉस: 614 रुपये प्रति शेअर
राजेश सातपुते:
शेअर: एमसीएक्स (फ्युचर)
मत: खरेदी करा
टार्गेट : 6250 - 6300 रुपये प्रति शेअर
स्टॉपलॉस: 6070 रुपये प्रति शेअर
रचना वैद्य:
शेअर: झोमॅटो (फ्युचर)
मत: खरेदी करा
टार्गेट : 240 - 255 रुपये प्रति शेअर
स्टॉपलॉस: 225 रुपये प्रति शेअर
advertisement
आशीष बहेती:
शेअर: अल्ट्राटेक सिमेंट
मत: खरेदी करा
टार्गेट : 11800 - 12000 रुपये प्रति शेअर
स्टॉपलॉस: 11400 रुपये प्रति शेअर
अमित सेठ:
शेअर: बीपीसीएल
मत: खरेदी करा
लक्ष्य: 265 - 270 रुपये प्रति शेअर
स्टॉपलॉस: 257 रुपये प्रति शेअर
सन्नी अग्रवाल:
शेअर: इंटरग्लोब एव्हिएशन
मत: खरेदी करा
टार्गेट : 5200 रुपये प्रति शेअर
advertisement
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. इक्विटी म्युच्युअल फंडांचे मागील परतावे भविष्यात अशाच कामगिरीची हमी मानले जाऊ शकत नाहीत. शेअर मार्केटमध्ये  गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
मराठी बातम्या/मनी/Share Market/
BPCL, बजाज आणि झोमॅटोसह 7 शेअर्समधून मिळणार चांगला रिटर्न, एक्सपर्टने सांगितलं टारगेट
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement